Join us

हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:49 AM

घाटकोपर, देवनार, शिवडी, भायखळा आणि कांदिवली येथील केंद्रांचा समावेश होता.

मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत मुंबईत पाच ठिकाणी स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यात घाटकोपर, देवनार, शिवडी, भायखळा आणि कांदिवली येथील केंद्रांचा समावेश होता.

दरम्यान, यानंतर आणखी ५ ठिकाणी पालिकेची ही केंद्रे स्थापन करण्याचा विचार पालिका करत असून ही केंद्रे प्रदूषणाचे पॅटर्न एकत्रित करेल, जेणेकरून प्रदूषणाचे विश्लेषण करणे सहज होणार आहे. पुढील ६ महिन्यांत ही केंद्रे कार्यन्वित करण्याचा पालिकेचा विचार असून त्यासाठी सध्या जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत मुंबईतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. 

सद्य:स्थितीत आम्ही अतिरिक्त केंद्रांसाठी जाग निश्चितीच्या प्रक्रियेत असून त्यासाठी काही जागांची निवडही करण्यात आली आहे. एकदा जागा निश्चिती झाली की, आम्ही निविदा प्रक्रिया सुरू करू, अशी माहिती पर्यावरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. खार, कांजूरमार्ग, बोरिवली, हाजी अली, परेल अशा काही स्थानकांची नावे जागा निश्चितीसाठी समोर आली असून ती लवकरच अंतिम होतील, अशी अपेक्षा आहे. 

...त्यानंतरच निविदा प्रक्रिया सुरू करू

फलकांद्वारे विभागनिहाय प्रदूषणाचे प्रमाण व वायू गुणवत्ता निर्देशांक, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड माहिती सल्ला यांचा समावेश असणार आहे. 

टॅग्स :प्रदूषणमुंबई