पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी

By admin | Published: January 30, 2017 02:25 AM2017-01-30T02:25:25+5:302017-01-30T02:25:25+5:30

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून विभागांमध्ये झालेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. नागरी समस्यांबरोबर वैयक्तिक कामे

At the center of the redevelopment issue | पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी

पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी

Next

मुंबई: महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून विभागांमध्ये झालेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. नागरी समस्यांबरोबर वैयक्तिक कामे आणि अन्य गोष्टींवर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. सी वॉर्डमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.
मुंबईत लोकसंख्येनुसार केलेल्या प्रभाग रचनेमुळे दक्षिण मुंबईतील वॉर्डची संख्या कमी झाली आहे. गेल्या निवडणुकांमध्ये सी वॉर्डमध्ये प्रभाग २१७, २१८ आणि २१९ यांचा समावेश होता. नवीन प्रभाग रचनेनुसार या वॉर्डमध्ये २२०, २२१ आणि २२२ प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये कामाठीपुरा, नळबाजार, गुलालवाडी, विठ्ठलवाडी, झवेरी बाजार, फणसवाडी, भुलेश्वर, लोहार चाळ, धोबी तलाव, सोनापूर, चंदनवाडी, जिमखाना, ठाकूरद्वार, चेऊलवाडी ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या वॉर्डमध्ये लोकवस्ती आणि बाजार अशा दोन्ही परिसरांचा समावेश आहे.
पूर्वीपासून या परिसरात चाळ संस्कृती रुजलेली आहे. पण, गेल्या काही वर्षांत शहरात झालेल्या बदलांमध्ये येथील चाळ संस्कृतीत ही बदल झाले आहेत. काही ठिकाणी छोट्या चाळींच्या जागी उंच टॉवर उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी चाळी जाऊन टॉवर उभे राहण्याच्या मार्गावर आहेत. पण, अजूनही अनेक चाळकरी पुनर्विकासाच्या मुद्द्यामुळे त्रस्त झाले आहेत. कारण, गेल्या काही वर्षांपासून पुनर्विकासाचा प्रश्न सुटलेला नाही. तर, काही ठिकाणी स्थानिक आणि विकासकांच्या मतभेदामुळे पुनर्विकासाचा मुद्दा गाजत आहे. ठाकूरद्वार, चंदनवाडी, भुलेश्वर, फणसवाडी, चेऊलवाडी या ठिकाणी लोकवस्ती अधिक प्रमाणात आहे. या ठिकाणी पुनर्विकासासाठी विकासक उत्सुक आहेत. त्यामुळे या निवडणुकांत राजकीय पक्षही या मुद्द्यावर भर देणार आहेत.
पुनर्विकासाच्या बरोबरीनेच पाणी, गटार आणि मीटर यादेखील समस्या या वॉर्डमध्ये आहेत. या सर्व भागांमध्ये सकाळी एकच तास पाणी येते. त्यातही काही भागांत गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारींचा सूर स्थानिकांकडून वाढत आहे. या ठिकाणी गटार बरोबरच लाईट मीटरच्या समस्या रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या भागातील लोकांची कामे केल्याचा दावा प्रमुख पक्ष करीत आहेत. तरीही या वॉर्डमधील समस्यांचे निराकरण झालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: At the center of the redevelopment issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.