मुंबई : थेअरॉटिकल ॲन्ड कम्प्युटेशनल सायन्स क्षेत्रातील शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून विद्यापीठात सेंटर फॉर एक्सलेंस इन थेअरॉटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्स सुरू करण्यात आले. सेंटर फॉर एक्सलेंस इन थेअरॉटिकल ॲन्ड कम्प्युटेशनल सायन्स मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची प्रतिक्रिया याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिली.ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठातील एका महत्त्वाच्या केंद्राचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. पद्मश्री प्रा. रोहिणी गोडबोले याही यावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनी यावेळी थेअरॉटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्सेसचे विविध क्षेत्रांतील महत्त्व स्पष्ट करत या केंद्राची उभारणी हे योग्य दिशेने उचललेले एक पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. ‘थेअरॉटिकल अँड कम्प्युटेशनल फिजिक्स क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेची सुरुवात ही करण्यात आली. दरम्यान, आयसीटीपीचे संचालक व काही कला टीआयएफआर येथे कार्यरत असलेले पॅरा अतिश दाभोळकर यांनी थेअरॉटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्स हे एक महत्त्वाचे क्षेत्र असून त्याबद्दल प्रामुख्याने विविध शाखांतील विद्यार्थी व संशोधकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. प्रा कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनीं केंद्राच्या मूळ संकल्पनेबद्दल माहिती दिली व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यासारखी इतर केंद्रे उभारण्याचा विद्यापीठाच्या मानस असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, संगणकीय संशोधन व शिक्षण क्षेत्रात हे केंद्र महत्वपूर्ण कामगिरी करेल असे नमूद केले. तसेच हे केंद्र आजची गरज असून याद्वारे अंतराळ विज्ञान या विषयात पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बायोइंफॉरमॅटिकस इ. मध्ये आंतरशाखीय प्रमाणपत्र व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा मजुमदार यांनी दिली.
मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू झालेले ‘’सैद्धांतिक व संगणकीय विज्ञान प्रकर्ष केंद्र’’ (सेंटर फॉर एक्सलेंस इन थेअरॉटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्सेस) हे अव्वल जागतिक दर्जा मिळविण्यास सज्ज असून याद्वारे विद्यार्थ्यांना संशोधन शाखांमध्ये आंतरशाखीय संशोधन व सहयोग यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ