मुंबई- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.आज मुंबईची वाहतूक समस्या जटील झाली आहे.गर्दीच्या वेळेत वाहने दहा ते पंधरा किलोमीटर वेगाने धावतात.दहिसर पासून मुंबईत जायला किमान दोन ते अडीचतास लागतात. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त व सुमार दर्जाचे असल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीने संपूर्ण मुंबईकर येथील वाहतूक व्यवस्था आणि त्याच्या समस्यांशी झुंज देत आहे. मुंबईच्या मेट्रो रेल्वेसाठी केंद्र सरकारच्या योगदानामुळे आज मुंबई शहरात मेट्रो रेल्वे धावत आहे.
त्याचप्रमाणे मुंबईतील रस्ते बांधणीसाठी केंद्राकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी नियम ३७७ अंतर्गत संसदेच्या सभागृहात मुंबईच्या रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रस्ताव मांडून त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.
त्यामुळे मुंबई शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसार सर्व मार्गावरील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम जलद गतीने होऊन विहित मुदतीत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०२७ पर्यंत देशाला ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं दृढ निश्चय आहे.त्यामुळे मुंबईचे रस्ते देखिल खड्डेमुक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे अशी भूमिका त्यांनी मांडली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने संपूर्ण देशात सुरू असलेल्या रस्तेबांधणीच्या काम जोमाने सुरू आहे. रस्ते मार्ग निर्माण कामाची सुरुवात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई पासूनच केली होती असे याची आठवण त्यांनी करून दिली.