Join us

आयआयटी मुंबई उभारणार जलशुद्धीकरणासाठी सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 3:09 AM

भारतातील आणि पर्यायाने जगातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन, तेथील पाण्याची गरज कशी आणि किती आहे यावर संशोधन करून त्याचा अभ्यास करणे आणि त्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे पर्याय सुचविण्यासाठी आयआयटी बॉम्बेने वॉटर इनोव्हेशन सेंटरचे पाऊल उचलले आहे.

मुंबई : भारतातील आणि पर्यायाने जगातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन, तेथील पाण्याची गरज कशी आणि किती आहे यावर संशोधन करून त्याचा अभ्यास करणे आणि त्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे पर्याय सुचविण्यासाठी आयआयटी बॉम्बेने वॉटर इनोव्हेशन सेंटरचे पाऊल उचलले आहे. वॉटर इनोव्हेशन सेंटर या उपक्रमासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी बॉम्बे), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी हैदराबाद, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे आणि पंडित दीनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटी, गांधीनगर यांचे सदस्य एकत्रित आले आहेत.आयआयटी बॉम्बे येथील रिसर्च अ‍ॅण्ड इनोव्हेशन येथे हे संशोधन या विद्यापीठांच्या सदस्यांकडून एकत्रितपणे सुरू आहे. केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून सदर संशोधन उपक्रमासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाण्याचे जाड धातू व पाण्यातील विविध खनिजांमुळे होणारे प्रदूषण, वॉटर मॅपिंग, डिसॅलिनेशन, जलसंशोधनाच्या बाबतीतील ज्ञाननिर्मिती आणि व्यवस्थापन, नवीन सुविधांसाठी शैक्षणिक सुविधांचे उपक्रम अशा विविध विषयांवर या संशोधन उपक्रमामध्ये काम करण्यात येणार आहे.शुद्ध आणि असुरक्षित पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या बाबतीत आयआयटीचे संचालक देवांग खक्कर यांनी या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वॉटर इनोव्हेशन सेंटर कसे महत्त्वपूर्ण ठरणार आहे याचे महत्त्व विशद केले. या संशोधन उपक्रमामध्ये आयआयटी बॉम्बेच्या महत्त्वपूर्ण सहभागाबद्दल त्यांनी अभिमानही व्यक्त केला. औद्योगिक आणि सामाजिक गरज असलेल्या शुद्ध पाण्याच्या गरजेसाठी वॉटर इनोव्हेशन सेंटरतर्फे माफक दारात सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आयआयटी बॉम्बेच्या रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक पी. व्ही. बालाजी यांच्यामार्फत वॉटर इनोव्हेशन सेंटरमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या संकलनाचे प्रकाशन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढणाºया व्यावसायिक परिघाच्या दृष्टीने वाढणारी लोकसंख्या आणि त्यांच्या औद्योगिक गरजाही वाढत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या समाजासाठी आवश्यक शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची गरज भागविणे हे खूप अवघड आणि जिकिरीचे काम आहे. वॉटर इनोव्हेशन सेंटर यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख संजय बाजपेयी यांनी दिली.विविध विषयांवर होणार संशोधनजाड धातू व पाण्यातील विविध खनिजांमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, वॉटर मॅपिंग, डिसॅलिनेशन, जलसंशोधनाच्या बाबतीतील ज्ञाननिर्मिती आणि व्यवस्थापन, नवीन सुविधांसाठी शैक्षणिक सुविधांचे उपक्रम अशा विविध विषयांवर या संशोधन उपक्रमामध्ये काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईपाणी