विशेष प्रतिनिधी ।मुंबई : आपण केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार नसून प्रदेशाध्यक्षपदीही रावसाहेब दानवे हेच राहतील, असे स्पष्टीकरण देत, आपण यापुढेही मुख्यमंत्रीपदी राहणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत स्वत: फडणवीस यांनीच आपण दिल्लीत जाणार असल्याचा इन्कार करताना, मला दिल्लीहून बोलावणे आले नाही व मी दिल्लीला जाणार नाही, असे स्पष्ट केले.फडणवीस म्हणाले की, बातम्या कमी पडल्या म्हणून मीडियावाले भाजपामध्ये काही बदल घडणार असल्याचे दाखवत असतात. पण मी इथेच राहणार असून दानवे यांनाही बदलले जाणार नाही. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे बदलाच्या बातम्या आता मीडियाने देऊ नयेत आणि कार्यकर्त्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये. मीडियातील बातम्यांचा उल्लेख त्यांनी दुकानदाºया असा केला व माध्यमांना टीकेचे लक्ष्य केले.प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या दाखविल्या गेल्या. पण प्रत्यक्षात असे काहीच होणार नाही. हे निर्णय बैठकांमध्ये होत नसतात. भाजपाची कार्यपद्धती पक्षजनांना ठाऊक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली नाही.>प्रकाश मेहतांचा उल्लेख नाहीघोटाळ्यांच्या आरोपांमुळेवादग्रस्त ठरलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आज कार्यकारिणीच्या बैठकीलाहजर होते. त्यांच्यावरील आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात कुठलाही उल्लेख केला नाही. मेहतांवरील आरोपांबाबत त्यांची पाठराखणदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नाही.>दानवेंना हाणला टोलाभाजपाच्या केंद्रीय प्रभारी सरोज पांडे यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना टोला हाणला. दानवे पूर्वी जास्त बोलत असत. आज ते कमी बोलले. त्यामुळे ते आता अधिक काम करतील असा विश्वास आपल्याला असल्याचे त्या म्हणाल्या.>नेते व कार्यकर्त्यांना कानपिचक्याराज्य सरकार चांगले निर्णय घेते ते सामान्य माणसांपर्यंत संपूर्ण ताकदीने पोहोचविण्याचे काम होताना दिसत नाही, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी नेते व कार्यकर्र्त्याना दिल्या. शरकारची कामे लोकांपर्यंत तुम्ही कशी पोहोचवता, यालाच आज महत्त्व आहे, असे ते म्हणाले.
केंद्रात जाणार नाही, मीच राहणार मुख्यमंत्रिपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:25 AM