Join us

केंद्र सरकारने जनतेला रिटर्न गिफ्ट दिलंय, जयंत पाटलांचा खोचक टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 3:01 PM

ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी मोदीसरकारचे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही..

ठळक मुद्देमहागाईचा नुसता भडका उडाला आहे, असे सांगतानाच मोदी सरकारने जनतेला या रुपात रिटर्न गिफ्ट दिले आहे, असे पाटील यांनी म्हटले. 

मुंबई - गत २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी मोदीसरकारचे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही... पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत... देशाचा जीडीपी मायनसमध्ये आहे... महागाईचा नुसता भडका उडाला आहे, असे सांगतानाच मोदी सरकारने जनतेला या रुपात रिटर्न गिफ्ट दिले आहे, असे पाटील यांनी म्हटले. 

विकासदर उणे 7.3 टक्क्यांवर

सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेलाय. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७.३ टक्क्य़ांवर घसरला आहे. अर्थमंत्रालयाचे प्रमुख सल्लागार सुब्रमण्यम यांनी म्हटले की, आर्थिक वर्ष 2020-21 मधील पहिल्या तिमाहीत घसरण 24.4 टक्के एवढी होती. आता, 2020-21 मध्ये इकॉनॉमिक कंस्ट्रक्शन -7.3 एवढा आहे, जो फेब्रुवारी महिन्यात अंदाजित -8 टक्क्यांमध्ये काही प्रमाणात सुधारीत आहे. 

होय, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था मंदावली...

लोकमतच्या सर्वेक्षणात दुसरा प्रश्न हा देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात होता. मोदी सरकार 2 च्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था सुधारली की तिची वाटचाल मंदावली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याही प्रश्नावरील सर्वेक्षण वाचकांना चांगला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार, 57.68 टक्के वाचकांनी मोदी सरकारच्या कारकीर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं मत नोंदलं आहे. 33.49 टक्के लोकांना वाटते, अर्थव्यवस्था सुधारली आहे. तर, 8.84 टक्के लोक या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेताना दिसून आले. त्यामुळे, मोदी सरकारच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं जनमत स्पष्ट दिसून आहे.

टॅग्स :जयंत पाटीलअर्थव्यवस्थानरेंद्र मोदीकेंद्र सरकार