केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत - नवाब मलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:21+5:302021-02-07T04:07:21+5:30
कुर्ला येथे चक्का जाम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्था ढासळली. मात्र, शेतकऱ्यांमुळे ती सावरली. भाजप शेतकऱ्यांची ...
कुर्ला येथे चक्का जाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्था ढासळली. मात्र, शेतकऱ्यांमुळे ती सावरली. भाजप शेतकऱ्यांची लूट करणारा पक्ष आहे. कृषी कायद्यांच्या माध्यमातून मंडी व्यवस्था संपविण्याचे षडयंत्र आहे. यामुळे व्यावसायिक शेती उत्पादन कमी भावाने खरेदी करून गोदामामध्ये साठवून ठेवतील व नंतर चढ्या दराने त्याची विक्री केली जाईल. शेतकऱ्यांचे यामुळे नुकसानच होईल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता दाखवून हे कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी अल्पसंख्याक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शनिवारी कुर्ला स्थानक (पूर्व) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होऊन मलिक यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात निषेध व्यक्त केला. या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.