यशवंत जाधव यांच्यावर गुन्हा नाेंदविण्यासाठी केंद्र सरकारची तक्रार, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे मुंबई पोलिसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:43 AM2022-04-07T11:43:35+5:302022-04-07T11:53:01+5:30

Yashwant Jadhav: मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने (एमसीए) सोमवारी मुंबई पोलिसांना पत्र लिहून जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे.

Central government's complaint to register a case against Yashwant Jadhav, letter from the Ministry of Corporate Affairs to the Mumbai Police | यशवंत जाधव यांच्यावर गुन्हा नाेंदविण्यासाठी केंद्र सरकारची तक्रार, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे मुंबई पोलिसांना पत्र

यशवंत जाधव यांच्यावर गुन्हा नाेंदविण्यासाठी केंद्र सरकारची तक्रार, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे मुंबई पोलिसांना पत्र

googlenewsNext

मुंबई : मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने (एमसीए) सोमवारी मुंबई पोलिसांना पत्र लिहून जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे. हे पत्र ४ एप्रिलला मरिन ड्राईव्ह पोलिसांना देण्यात आले आहे. 
कॉर्पोरेट कंपनी मंत्रालयाच्या (एमसीए) अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रानुसार, प्रधान डीलर्ससह सहा कंपन्यांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०, १२० (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची तक्रार केली आहे.  या तक्रारीत जाधव यांचे नाव नसले तरीही या सगळ्या कंपन्या जाधव यांच्याशी संबंधित असल्याचे एमसीएने म्हटले आहे. जाधव यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासामध्ये या कंपनीने केलेले गैरव्यवहार समोर आले आहेत. 
एमडीएने कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अनियमिततेशी संबंधित मुद्द्यांवर प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडची तपासणी केली. या कंपनीचे शेअरहोल्डर असलेल्या दोन संस्था या कोलकातामधील आहेत. स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. या शेल कंपन्या कोलकाता येथील एंट्री ऑपरेटर्सनी तयार केल्या आहेत. 
जाधव यांच्या कुटुंबीयांना १५ कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज या कंपन्यामार्फत दिले गेले. जाधव यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या रोख रकमेच्या बदल्यात या कंपनीकडून असुरक्षित कर्जे दिली गेली. तसेच बहुस्तरीय व्यवहारांद्वारे लाँड्रिंग केल्याचे तपासात आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

मनी लाँड्रिंगसाठी वापर
nप्राथमिक तपासणीत या कंपन्यांचा मनी लाँड्रिंगसाठी वापर केल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार कंपनी 
कायद्यांतर्गत त्यांची चौकशी केली जात आहे. 
nभाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई करत, एमसीएने कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अनियमिततेशी संबंधित मुद्द्यांवर प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडची तपासणी केली होती. येत्या काळात जाधव यांच्याविरुद्ध कारवाईची शक्यता आहे.

Web Title: Central government's complaint to register a case against Yashwant Jadhav, letter from the Ministry of Corporate Affairs to the Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.