केंद्र सरकारचे शेतमालाचे हमीभाव कागदावरच, प्रत्यक्षात दर कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:56 AM2020-06-08T05:56:18+5:302020-06-08T05:56:43+5:30

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे बाजार समित्यांनी आवक व बाजार भावाची माहिती नोंदविलेली आहे.

The central government's guarantee of agricultural commodities is only on paper, in fact the rates are low | केंद्र सरकारचे शेतमालाचे हमीभाव कागदावरच, प्रत्यक्षात दर कमीच

केंद्र सरकारचे शेतमालाचे हमीभाव कागदावरच, प्रत्यक्षात दर कमीच

Next

योगेश बिडवई 

मुंबई : केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामातील १४ पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर करताना उत्पादन खर्चाच्या दीडपटीहून अधिक परतावा मिळेल, याची काळजी घेतल्याचा दावा केला. मात्र ‘लोकमत’ने गुरुवारी राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या शेतमालाची माहिती घेतल्यानंतर हमीभावापेक्षाही काही शेतमालाचे दर प्रत्यक्षात कमी असल्याचे आढळले आहेत. सरकारने जाहीर केलेला हमीभाव केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे बाजार समित्यांनी आवक व बाजार भावाची माहिती नोंदविलेली आहे. त्यावरून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे स्पष्ट होते. शेतमालाची प्रतवारी चांगली नसल्याचे कारण देत व्यापारी
अपेक्षित भाव देत नाहीत. तसेच सरकारने शेतमालाची हमीभावाने खरेदी करावी, असे त्यांचे म्हणणे असते. बºयाचदा व्यापारी हमीभावाने खरेदीचे बिल तयार करतात, मात्र तेवढा भाव देत नाहीत. शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने त्यांचाही नाईलाज असतो.

हमीभावानुसार व्यापारी शेतमालाला दाम देत नसल्याबाबत आम्ही
अनेक बाजार समित्यांमध्ये वारंवार तक्रारी करतो. मात्र व्यापाºयांवर कोणतीही कारवाई होत नाही. - अनिल पवार, प्रवक्ते,
स्वाभिमानी शेतकरी संघटना

मोदी सरकार शेतकºयांसाठी खूप काही करतंय, हे शहरी मध्यमवर्गीयांना दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. हमीभाव हा
फार्स आहे. शेतकरी आता या घोषणांवर विश्वास ठेवत नाही.
- अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्र

भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तेलबिया आणि डाळींच्या हमीभावात चांगली वाढ केली आहे. शेतकºयांनीही आता पिकांमध्ये बदल करावा. तेलबियांकडे
वळणे गरजेचे आहे.
- पाशा पटेल, माजी अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग, महाराष्ट्र

हमीभाव व शेतकºयांना मिळणारा दाम (प्रति क्वि./रूपये)
शेतमाल जाहीर सर्वसाधारण दर/ राज्यातील
हमीभाव बाजार समिती सर्वसाधारण दर
धान १,८६८ २,१०० (मुल, चंद्रपूर) -
ज्वारी २,६२० २,३०० (कर्जत, अहमदनगर) २,३६६
बाजरी २,१५० १,४४८ (अमळनेर,जळगाव) १,३९७
मका १,८५० १,४०० (कर्जत, अहमदनगर) १,१६६
तूर ६,००० ५,१६२ (अमरावती) ४,८३५
मूग ७,१९६ ६,००० (अकोला) ६,२०६
उडीद ६,००० ५,६०५ (लोणार, बुलडाणा) ४,६९४
भुईमूग ५,२७५ ४६७७ (खामगाव) -
सोयाबीन ३,८८० ४,००० (वाशिम) ३,५०४
सूर्यफूल ५,८८५ २,७०० (बीड) २,७००
कापूस ५,८२५ ५,१९० (राळेगाव, यवतमाळ) ५,२३१
(गुरुवारी राज्यात सर्वाधिक आवक झालेल्या बाजार समितीमधील व राज्यातील
३०५ बाजार समित्यांमधील संबंधित शेतमालाचे सर्वसाधारण दर दिले आहेत.)

Web Title: The central government's guarantee of agricultural commodities is only on paper, in fact the rates are low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.