Join us

केंद्र सरकारचे शेतमालाचे हमीभाव कागदावरच, प्रत्यक्षात दर कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 5:56 AM

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे बाजार समित्यांनी आवक व बाजार भावाची माहिती नोंदविलेली आहे.

योगेश बिडवई 

मुंबई : केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामातील १४ पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर करताना उत्पादन खर्चाच्या दीडपटीहून अधिक परतावा मिळेल, याची काळजी घेतल्याचा दावा केला. मात्र ‘लोकमत’ने गुरुवारी राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या शेतमालाची माहिती घेतल्यानंतर हमीभावापेक्षाही काही शेतमालाचे दर प्रत्यक्षात कमी असल्याचे आढळले आहेत. सरकारने जाहीर केलेला हमीभाव केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे बाजार समित्यांनी आवक व बाजार भावाची माहिती नोंदविलेली आहे. त्यावरून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे स्पष्ट होते. शेतमालाची प्रतवारी चांगली नसल्याचे कारण देत व्यापारीअपेक्षित भाव देत नाहीत. तसेच सरकारने शेतमालाची हमीभावाने खरेदी करावी, असे त्यांचे म्हणणे असते. बºयाचदा व्यापारी हमीभावाने खरेदीचे बिल तयार करतात, मात्र तेवढा भाव देत नाहीत. शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने त्यांचाही नाईलाज असतो.हमीभावानुसार व्यापारी शेतमालाला दाम देत नसल्याबाबत आम्हीअनेक बाजार समित्यांमध्ये वारंवार तक्रारी करतो. मात्र व्यापाºयांवर कोणतीही कारवाई होत नाही. - अनिल पवार, प्रवक्ते,स्वाभिमानी शेतकरी संघटनामोदी सरकार शेतकºयांसाठी खूप काही करतंय, हे शहरी मध्यमवर्गीयांना दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. हमीभाव हाफार्स आहे. शेतकरी आता या घोषणांवर विश्वास ठेवत नाही.- अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्रभारताला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तेलबिया आणि डाळींच्या हमीभावात चांगली वाढ केली आहे. शेतकºयांनीही आता पिकांमध्ये बदल करावा. तेलबियांकडेवळणे गरजेचे आहे.- पाशा पटेल, माजी अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग, महाराष्ट्रहमीभाव व शेतकºयांना मिळणारा दाम (प्रति क्वि./रूपये)शेतमाल जाहीर सर्वसाधारण दर/ राज्यातीलहमीभाव बाजार समिती सर्वसाधारण दरधान १,८६८ २,१०० (मुल, चंद्रपूर) -ज्वारी २,६२० २,३०० (कर्जत, अहमदनगर) २,३६६बाजरी २,१५० १,४४८ (अमळनेर,जळगाव) १,३९७मका १,८५० १,४०० (कर्जत, अहमदनगर) १,१६६तूर ६,००० ५,१६२ (अमरावती) ४,८३५मूग ७,१९६ ६,००० (अकोला) ६,२०६उडीद ६,००० ५,६०५ (लोणार, बुलडाणा) ४,६९४भुईमूग ५,२७५ ४६७७ (खामगाव) -सोयाबीन ३,८८० ४,००० (वाशिम) ३,५०४सूर्यफूल ५,८८५ २,७०० (बीड) २,७००कापूस ५,८२५ ५,१९० (राळेगाव, यवतमाळ) ५,२३१(गुरुवारी राज्यात सर्वाधिक आवक झालेल्या बाजार समितीमधील व राज्यातील३०५ बाजार समित्यांमधील संबंधित शेतमालाचे सर्वसाधारण दर दिले आहेत.)

टॅग्स :शेतकरीमुंबई