नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती; फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका- किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 05:45 PM2022-09-12T17:45:39+5:302022-09-12T17:46:19+5:30

सदर प्रकरणानंतर आज नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली.

Central Minister Narayan Rane's background is treacherous; said that former mayor Kishori Pednekar | नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती; फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका- किशोरी पेडणेकर

नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती; फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका- किशोरी पेडणेकर

Next

मुंबई- शिंदे गटाची ताकद काय आहे ते काळानुसार कळेल. ठाकरे गटाच्या या असल्या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल. सरकार आमचं हे लक्षात ठेवा. असले प्रकार चालू देणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. नारायण राणे यांनी आज शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. 

नारायण राणेंच्या या विधानावर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे इशारा देताय की धमक्या देताय. महाराष्ट्रातलं सरकार धमक्या देणारं सरकार आहे का?, असं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारावं असं वाटतंय. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असं नारायण राणे म्हणताय. नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती आहे आणि आता ते आम्हाला सांगणार?, नारायण राणेंची इमेज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे अशा फालतू धमक्या मुंबई आणि महाराष्ट्रात देऊ नका, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. 

अनंत चतुदर्शीनिमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रभादेवीत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार हाणामारी झाली. यात आमदार सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांची उद्धव ठाकरे गटासोबत वाद झाला. यात सदा सरवणकर यांनी शिवसैनिकांना धमकावण्यासाठी त्यांच्याकडील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्याअंतर्गत सदा सरवणकर यांच्या विरोधात पोलिसांनी आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. 

सदर प्रकरणानंतर आज नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही आता युतीत आहोत. त्यामुळे घटनेची माहिती घेण्यासाठी आलो होतो, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. प्रभादेवीत घडलेल्या घटनेबाबत विचारपूस करण्यासाठी सदा सरवकरणकरांची भेट घेतली. मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारींचं मार्केटिंग सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांनाही फिरायचं आहे. परवानगी घ्यावी लागेल याचा त्यांनीही विचार करावा. ५० लोक एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी घरावर येतात मग त्यांच्यावर कोणत्या अॅक्ट अंतर्गत कारवाई करणार?", असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. 

Web Title: Central Minister Narayan Rane's background is treacherous; said that former mayor Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.