Join us

केंद्राने उपटले मुंबई महापालिकेचे कान

By admin | Published: December 31, 2015 3:56 AM

शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यातून पालिकेला मिळकतही देणारा गोराई येथील डम्पिंग ग्राऊंडवरील प्रकल्प बंद पडला आहे़ या प्रकल्पाकडे जगाचे लक्ष असताना या

मुंबई : शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यातून पालिकेला मिळकतही देणारा गोराई येथील डम्पिंग ग्राऊंडवरील प्रकल्प बंद पडला आहे़ या प्रकल्पाकडे जगाचे लक्ष असताना या जागेचा चांगला वापर होत नसल्याबद्दल खेद व्यक्त करीत स्वच्छ भारत अभियानाचे सहसंचालक प्रवीण प्रकाश यांनी महापालिकेचे आज पत्रकार परिषदेत कान टोचले़प्रवीण प्रकाश यांनी पालिकेच्या मुख्यालयाला आज भेट दिली़ यावेळी त्यांनी पत्रकारांना अभियानांतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्पांची माहिती दिली़ यावेळीस त्यांनी गोराई डंपिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला़ आज हा प्रकल्प बंद पडला असून या जागेचा वापर केला जात नाही़ त्यामुळे लवकरच हा प्रकल्प सुरु करण्याचा सल्लाही त्यांनी प्रशासनाला दिला़मुंबईमध्ये दुकानांतून कचरा गोळा केला जात नाही़ हा कचरा गोळा करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलावीत़ वेळ पडल्यास दुकानदारांना कर आकारावा, अशी सूचना त्यांनी केली़ देशातील ७५ शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण होणार आहे़ मुंबईत १ ते १५ जानेवारीदरम्यान हा सर्व्हे होईल़ शौचालय बांधण्यास बक्षीसमुंबईमध्ये आजच्या घडीला एक लाख १५ हजार शौचालयांची गरज आहे़ डिसेंबर २०१६पर्यंत एक लाख शौचालये पालिकेने बांधावीत, असे आदेश प्रकाश यांनी दिले आहेत़ घराघरांमध्ये शौचालय बांधता यावे, यासाठी पालिकेला मलनि:स्सारण वाहिनी टाकण्याची सूचना त्यांनी केली़ शौचालय बांधण्यासाठी प्रत्येकी ६५०० रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत मुंबईसाठी चारशे कोटी रूपये केंद्राकडून येणार आहेत़ यापैकी दोनशे कोटी घनकचरा व्यवस्थापन, ५० कोटी जनजागृतीसाठी मिळणार आहेत़ यापैकी साडेआठ कोटी रुपये पालिकेला देण्यात आले आहेत़ कचऱ्यातून वीजनिर्मितीकचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या पालिकांना केंद्र प्रती मेट्रिक टन दीड हजार रुपये देणार आहे़ कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या पालिकेकडून वीज कंपन्यांनी राज्य वीज नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दरांमध्ये वीज खरेदी करण्याचा कायदाच तयार होणार आहे़ त्यामुळे पालिकेनेच यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रकाश यांनी केले़स्वच्छतेचे सर्वेक्षण