Join us

मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने; दुरांतो एक्स्प्रेस अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीतच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 11:14 AM

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. आसनगावजवळ मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीत झाली होती. ती अजूनही कायम आहे

मुंबई, दि. 1- मध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. आसनगावजवळ मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीत झाली होती. ती अजूनही कायम आहे. त्यातच मुंबईत मंगळवारी झालेल्या तुफान पावसामुळे अनेक लोकल बिघडल्या आहेत. तसंच रेल्वेचं कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या निर्धारीत वेळेपेक्षा अनेक तास उशिरा धावत आहेत. त्याचाही ताण लोकल वाहतुकीवर पडला असल्याची माहिती मिळते आहे.

मंगळवारपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेच्या लोकल जवळपास अर्धा तास उशिरानं धावत आहेत. तर दुसरीकडे टिटवाळा-कसारा मार्ग अजूनही ठप्प आहे. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात मध्य रेल्वेच्या 35 लोकलमध्ये तर पश्चिम रेल्वेच्या 7 लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर काल रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालविण्यात आल्या. त्यामुळे या 35 तांत्रिक बिघाड झालेल्या लोकल रुळावर यायला आणखी दोन दिवसांचा वेळ लागणार आहे.

वाशिंद रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको; दादर-अमृतसर एक्स्प्रेस 35 मिनिटं धरली रोखूननागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मंगळवारी रुळावरून घसरल्याची घटना आसनगाव स्थानकाजवळ घडली होती. 72 तासांपासून टिटवाळा-आसनगाव रेल्वेसेवा बंद आहे. रेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. कसारा, आसनगावमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना मुंबईत कामावर हजर राहणं शक्य होत नाहीये. याकारणामुळे शुक्रवारी सकाळी रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झालेला पाहायला मिळतो आहे. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेलरोको केला होता. पण काही वेळानंतर हा रेलरोको मागे घेण्यात आला आहे. पोलिसांनी आता आदोलनकर्त्या प्रवाशांता रेल्वे रूळावरून बाजूला केल्याची माहिती मिळते आहे. वाशिंद स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्सप्रेस तब्बल 35 मिनिटं रोखून धरली होती. तसंच रेल्वे सेवा कधी पूर्वपदावर येणार? अशी विचारणा काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे केली. तीन दिवसांपासून बंद असलेली सेवा पूर्वपदावर यायला अजून आठ दिवस तरी लागतील, असं उत्तर या संतप्त प्रवाशांचा देण्यात आल्याचं समजतं आहे. दरम्यान, लोकलसेवा लवकरात लवकर पूर्ववत करा, अशी मागणी रेलरोको करणाऱ्या प्रवाशांकडून केली जाते आहे.

टॅग्स :मध्ये रेल्वेभारतीय रेल्वे