मध्य रेल्वे प्रशासन मर्यादित रेल्वे कर्मचारी कामावर बोलावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 06:45 PM2020-05-24T18:45:08+5:302020-05-24T18:45:31+5:30

व्हायरल व्हिडिओचा मध्य रेल्वेने घेतला धसका 

Central Railway Administration will call for limited railway staff | मध्य रेल्वे प्रशासन मर्यादित रेल्वे कर्मचारी कामावर बोलावणार

मध्य रेल्वे प्रशासन मर्यादित रेल्वे कर्मचारी कामावर बोलावणार

Next

 

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली. मात्र दोन दिवसांपूर्वी कर्मचाऱ्याच्या विशेष लोकलमधील गर्दी आणि दाटीवाटीच्या प्रवासाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये फिजिकल डिस्टिन्सिंग नियमाचे उल्लंघन झाले. या व्हायरल व्हिडिओचा धसका घेत मध्य रेल्वे प्रशासनाने वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ९३ टक्यांपर्यत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, आता वर्कशॉपमध्ये फक्त ७ टक्के म्हणजेच ५०० कर्मचारी कामावर उपस्थित राहणार आहेत.

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक विशेष ट्रेन सोडल्या आहे. यासह आता अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरु करण्याची घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशाॅप मधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी मध्य रेल्वेकडून कर्जत ते सीएसएमटी, कसारा ते सीएसएमटी आणि पनवेल ते सीएसएमटी या दरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहे. मात्र कर्मचारी संख्या जास्त असल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये आसन मिळत नाही. त्यामुळे उभे राहून प्रवास करावा लागत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतुन समोर आली आहे. यासह फिजिकल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा वाजले होते. अशा पद्धतीने कर्मचारी जर कामावर येत असतील तर कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

रेल्वे कर्मचारी संघटना यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात रेल्वे प्रशासनाची माटुंगा वर्कशॉपमध्ये एक बैठक झाली. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टिन्सिंग हा एकमेव उपाय असल्यामुळे कर्मचाऱ्याची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता ७ हजार ५०० ऐवजी फक्त ५०० कर्मचारी कामावर येणार आहेत.

Web Title: Central Railway Administration will call for limited railway staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.