मुंबई : सलग दुस-या दिवशीही मध्य रेल्वेला लेटमार्क लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. शुक्रवारी ११ वाजून १० मिनिटांनी माटुंगा ते सायनदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे धिम्या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर पूर्णपणे ठप्प होती. परिणामी शुक्रवारी दुपारच्या सत्रातील लोकल फेºया सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. दुसरीकडे सुविधा एक्स्प्रेसचे इंजीनही शुक्रवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी आटगाव ते तानशेत मार्गादरम्यान बंद पडले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. याआधी गुरुवारी आटगाव आणि तानशेतदरम्यान मालगाडीचे इंजीन बिघडल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.शुक्रवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी माटुंगा ते सायनदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता ‘पिक अवर’ निघून गेल्याचे अजब उत्तर प्रशासनाने दिले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सिग्नलअभावी लोकल उभी असल्याने प्रवाशांनी जीव धोक्यात घालत रेल्वे रुळांवरून चालत सायन रेल्वे स्थानक गाठणे पसंत केले. अखेर ११ वाजून ४० मिनिटांनी सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र यामुळे दुपारच्या सत्रातील लोकल फेºया सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. या बिघाडामुळे केवळ ८-१० लोकल फेºया रद्द करण्यात आल्या. तर रेल्वे प्रशासनाने लोकल फेºया केवळ ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी सुविधा एक्स्प्रेसचे इंजीनही दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी आटगाव ते तानशेत मार्गादरम्यान बंद पडले होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. गुरुवारी आटगाव आणि तानशेत स्थानकांदरम्यान संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मालगाडीच्या इंजीनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा दिशेकडील वाहतूक काही काळ बंद झाली होती. त्याचबरोबर काही अंशी लोकल फेºया आसनगाव स्थानकात रद्द करण्यात आल्या होत्या.मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी माटुंगा ते सायनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी धिम्या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर पूर्णपणे ठप्प होती, तर दुपारच्या सत्रातील लोकल फेºया सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. दुसरीकडे बारावीचा पेपर ११ वाजता सुरू झाला. तत्पूर्वी विद्यार्थी साडेदहा वाजण्यापूर्वीच परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. त्यामुळे रेल्वे गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला नाही. परिणामी पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. महत्त्वाचे म्हणजे रेल्वे गोंधळाची वार्ता कानी पडताच संबंधित परीक्षा केंद्रात उशिरा पेपर देता येईल, यासंबंधी योग्य त्या सूचना केल्याचे बोर्डानेही स्पष्ट केले.
मध्य रेल्वेला पुन्हा लेटमार्क, सुविधा एक्स्प्रेसचे इंजीनही पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 5:00 AM