कोरोनावर मात करण्यासाठी मध्य रेल्वेची जागरूकता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:46+5:302021-04-13T04:06:46+5:30

लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी जागरूकता मोहीम सुरू ...

Central Railway awareness campaign to overcome Corona | कोरोनावर मात करण्यासाठी मध्य रेल्वेची जागरूकता मोहीम

कोरोनावर मात करण्यासाठी मध्य रेल्वेची जागरूकता मोहीम

googlenewsNext

लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी जागरूकता मोहीम सुरू केली आहे. यामध्ये विविध घोषवाक्य असलेले भित्तिपत्रक, दृक-श्राव्य माध्यमातील स्लाईड्सचा समावेश आहे. याद्वारे प्रवााशांना कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी माहिती देण्यात येत असून लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘लक्ष द्या! दक्ष रहा, सुरक्षित रहा’, ‘करा बचाव स्वतःचा आणि आपल्या निकटवर्तीयांचा’ अशी रेल्वेची काही घोषवाक्ये लोकप्रिय ठरत आहेत. लसीकरण करून घ्या, मास्क परिधान करा, कोरोना नियमांचे पालन करा, स्वच्छता, औषधे आणि कठोर शिस्त या त्रिसूत्रीने होईल. कोरोनावर मात अशी भित्तिपत्रके व स्लाईड्स मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर व सोलापूर विभागातील विविध स्थानकांवर चिटकविण्यात/दर्शविण्यात आली आहेत.

दरम्यान रेल्वेमधून केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली असून प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनानने केले आहे.

.............................

Web Title: Central Railway awareness campaign to overcome Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.