Mega Block on Central Railway: मध्य रेल्वेचा शुक्रवारपासून ७२ तासांचा मेगा ब्लॉक, मेल, एक्स्प्रेससह अनेक लोकल फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 08:04 AM2022-02-02T08:04:41+5:302022-02-02T08:05:33+5:30
72-hour Mega Block on Central Railway: मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अखेरच्या टप्यात आहे. आता या मार्गिकांमधील कामांसाठी ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ७२ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अखेरच्या टप्यात आहे. आता या मार्गिकांमधील कामांसाठी ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ७२ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेससह अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत.
ठाणे ते दिवादरम्यान ९ किलोमीटर अंतराच्या दोन मार्गिकांचे काम अंतिम टप्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या १४ तासांच्या ब्लॉकमध्ये एक नवीन डाऊन जलद मार्गिका सुरू करण्यात आली. या मार्गिकेवरून रेल्वे सेवा धावण्यास सुरुवात झाली आहे; तर प्रस्तावित ब्लॉकमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे.