मुंबई : मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान २९.४२ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील २०.७६ दशलक्ष टन वाहतुकीच्या तुलनेत ४१.७ टक्के वाढली आहे.
मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२१ मध्ये ५.५५ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ४.२९ दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २९.३७ टक्के वाढ झाली आहे. या जास्त मालवाहतुकीचे लोडिंग प्रामुख्याने मध्य रेल्वेने झोनल आणि विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्सद्वारे घेतलेल्या पुढाकारांना आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑगस्ट २०२१ मध्ये २.९६ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे, जी गेल्या वर्षीच्या २.०९ दशलक्ष टन वाहतुकीच्या तुलनेत ४१.६२ टक्के वाढली आहे. नागपूर विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान १६.५३ दशलक्ष टन मालवाहतूक ५५.३५ टक्के वाढ दर्शविली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत १०.६४ दशलक्ष टन होती. सोलापूर विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ मध्ये २.९० दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १.७१ दशलक्ष टनांच्या तुलनेत ६९.५ टक्क्यांनी वाढलेली आहे.
भुसावळ विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान २.२८ दशलक्ष टन मालवाहतूक करून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील २.०३ दशलक्ष टनांच्या तुलनेत १२.३१ टक्क्यांनी वाढली आहे, तर पुणे विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान ०.७२ दशलक्ष टन मालवाहतूक लोड करून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ०.४६ दशलक्ष टन॔च्या तुलनेत ५४ टक्के वाढ दर्शविली आहे.
---
मुंबई विभागाची ऑगस्टमध्ये १.३६ दशलक्ष टन मालवाहतूक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ऑगस्ट २०२१ मध्ये १.३६ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदविली जी गेल्या वर्षीच्या १.२८ दशलक्ष टनांच्या तुलनेत ६.२५ टक्के अधिक आहे. मुंबई विभागाने एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान ६.९९ दशलक्ष टनांची मालवाहतूक करून १८.२७ टक्के वाढ दर्शविली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ५.९१ दशलक्ष टन होती.