५० मीटर ट्रॅक लीड तारांचे नूतनीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेने ठाणे-कल्याण अप ते डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉकदरम्यान देखभाल-दुरुस्तीची कामे केली. यात ८२ मीटर रूळ बदलण्यात आले. ग्लू जोड, स्विचेस व वेल्डिंगचे काम तसेच ५० मीटर ट्रॅक लीड तारांचे नूतनीकरणही करण्यात आले.
गर्डर पुलावर १०० मीटर पॅकिंग अलाइनमेंट आणि १०४ चॅनेल स्लीपर पाहण्यात आले. नाल्यांची साफसफाई, झाडेझुडपे काढून टाकणे आदी कामे करण्यात आली. युनिमॅट व डुमॅटिक मशीनद्वारे १.७ किलोमीटर ट्रॅक टेम्पिंगचे कामही हाती घेण्यात आले. रावळी जंक्शन येथील सिग्नलचा टायमर बदलण्यात आला. रूळ नूतनीकरणाच्या माध्यमातून ७६ तपासणी आणि छिद्रांचे काम करण्यात आले. अभियांत्रिकी विभागाशी समन्वयाने ५० मीटर ट्रॅक लीड तारांचे नूतनीकरण, गेज प्लेटच्या स्पाइकचे नूतनीकरण, सिग्नल युनिट्स बदलणे, सिग्नल पोस्ट, सिग्नल बेस, सिग्नल व दूरसंचार दुरुस्ती इत्यादी कामे करण्यात आली.
.......................