मध्य रेल्वेचा खोळंबा

By admin | Published: October 4, 2016 05:17 AM2016-10-04T05:17:28+5:302016-10-04T05:17:28+5:30

धुके, लोकलच्या डब्यात प्रवाशांकडून आपत्कालीन साखळी खेचण्याचे प्रकार आणि सीएसटीत लोकलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड, यामुळे मध्य रेल्वेचा सकाळी ९ वाजल्यापासून तब्बल चार तास खोळंबा झाला.

Central Railway Detention | मध्य रेल्वेचा खोळंबा

मध्य रेल्वेचा खोळंबा

Next

मुंबई : धुके, लोकलच्या डब्यात प्रवाशांकडून आपत्कालीन साखळी खेचण्याचे प्रकार आणि सीएसटीत लोकलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड, यामुळे मध्य रेल्वेचा सकाळी ९ वाजल्यापासून तब्बल चार तास खोळंबा झाला. सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्यांना विलंब झाला.
पावसामुळे उपनगरात मोठ्या प्रमाणात धुके निर्माण झाल्याने, पहाटेपासून मोटरमनना लोकल चालवण्यास अडथळे निर्माण होत होते. सिग्नल दिसत नसल्याने लोकलचा वेग मंदावला होता. त्यातच सकाळी ९ ते ९.३0 च्या दरम्यान डोंबिवली व कल्याण येथे अंबरनाथ लोकलमध्ये दोनदा प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचली. सीएसटी येथेही लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. लोकल १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी ९ च्या सुमारास सीएसटी स्थानकात ठाण्याला येणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तो दूर करण्यास २० मिनिटे लागली. सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद आणि धिम्या लोकल उशिराने धावू लागल्या. जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी दुपारी एकपर्यंत समस्या असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Central Railway Detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.