मध्य रेल्वे दिव्यांगस्नेही; १११ सरकते जिने अन् ५६ लिफ्टमधून प्रवाशांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 10:23 AM2022-12-03T10:23:34+5:302022-12-03T10:24:39+5:30

आणखी सोयी वाढविणार; आता गरज दुरुस्ती- देखभालीची

Central Railway Disabled Friendly; 111 escalators, 56 elevators | मध्य रेल्वे दिव्यांगस्नेही; १११ सरकते जिने अन् ५६ लिफ्टमधून प्रवाशांची सोय

मध्य रेल्वे दिव्यांगस्नेही; १११ सरकते जिने अन् ५६ लिफ्टमधून प्रवाशांची सोय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आज जागतिक अपंग दिन आहे. रेल्वे स्टेशनात पोहोचण्यापासून लोकल-एक्स्प्रेसमध्ये शिरण्यापर्यंत अपंगांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वेचे सरकते जीने आणि लिफ्ट यामुळे त्यांचा मार्ग सोपा होतो. मध्य रेल्वेवर १११ सरकते जिने आणि ५६ लिफ्ट असून येत्या काही दिवसांत त्यामध्ये २० लिफ्ट आणि २० सरकते जिन्यांची भर पडणार आहे. त्यामुळे स्थानकातून झटपट बाहेर पडणे आणि पोहोचणे शक्य होणार आहे. 

काही प्रवासी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर पोहोचण्यासाठी रुळ ओलांडून जातात. कार्यालयीन वेळांमध्ये पादचारी पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे पुलावरून जाण्याऐवजी प्रवासी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करतात आणि काही वेळा प्रवाशांच्या जिवावर बेतते. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि उद्वाहक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मध्य रेल्वे प्रवाशांना विविध सोयी-सवलती देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबई विभागातील अनेक स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्यात आले आहेत. आवश्यक तेथे आणखी  सरकते जिने आणि लिफ्ट वाढविण्यात  येतील. 
- प्रवीण पाटील, 
जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

या स्थानकात बसवणार लिफ्ट
मध्य रेल्वेवर लवकरच २० लिफ्ट बसवण्यात येणार आहेत.  त्यात  भायखळा ३,पनवेल २, जीटीबीनगर १, मुंब्रा २, अटगाव १,खर्डी १, अंबरनाथ १,इगतपुरी १, चुनभट्टी १, टिटवाळा १, वांगणी १, भिवपुरी १, वळसाड १,मुलुंड १, शिवडी १,किंग सर्कल १  स्थानकांचा समावेश आहे.

सध्या पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांमध्ये ९३ सरकते जिने आहेत आणि ४० लिफ्ट आहेत, तर येत्या काही दिवसांत पश्चिम रेल्वेकडून ३० लिफ्ट आणि ३० सरकते जिने लावण्यात येणार आहेत.

या स्थानकात बसविणार सरकते जिने 
मध्य रेल्वेवर लवकरच २० सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.  त्यात  भायखळा २,विद्याविहार २, विक्रोळी २, आंबिवली १,मुंब्रा २, दिवा २, डोंबिवली २, ठाकुर्ली २,इगतपुरी २, कांजूरमार्ग २,जीटीबीनगर १  स्थानकांचा समावेश आहे

प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशासनाने स्थानकावर एस्केलेटर बसविले. मात्र, त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने ते वारंवार बंद पडत आहेत. या जिन्यांचा प्रवाशांना कुठलाच फायदा होत नाही.    - अभिषेक शेवाळे, प्रवासी.

 हा चांगला उपक्रम आहे. मात्र, काही स्थानकांतील सरकते जिने अपंग प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. मध्य रेल्वेने अपंग डब्यांच्या जवळपास सरकते जिने, लिफ्ट उभारणे आवश्यक आहे. 
- अमित मोटे, प्रवासी,

 

Web Title: Central Railway Disabled Friendly; 111 escalators, 56 elevators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.