मुंबई- मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. सायन आणि माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. ऐन कार्यालयीन वेळेत मध्य रेल्वेचा बोऱ्या वाजल्यानं प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे.आज सकाळी 7 वाजून 20 मिनिटांच्या जवळपास सायन आणि माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले, त्यामुळे मध्य रेल्वेची अप धीम्या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला.रेल्वे प्रशासनानं लागलीच दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेवरची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिरानं सुरू आहे. लोकल उशिरानं धावत असल्यानं ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथील रेल्वे स्टेशनांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.
Mumbai Train Update : मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 09:38 IST