ठाण्याकडे जाणाऱ्यांचे दुहेरी हाल; रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रस्ते वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 07:25 PM2018-04-27T19:25:51+5:302018-04-27T19:25:51+5:30
कल्याण, अंबरनाथ, ठाणे, डोंबिवलीच्या दिशेनं निघालेल्यांचे प्रचंड हाल
Next
मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. याशिवाय ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी झालीय. त्यामुळे कार्यालयांमधून घरी निघालेल्या लोकांचे हाल होत आहेत.
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यानं लोकल वाहतुकीचा खोळंबा झालाय. तर मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्यानं कार्यालयांमधून घरी परतणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. कोपरी पूल, मुलुंड टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं कल्याण, अंबरनाथ, ठाणे, डोंबिवलीच्या दिशेनं निघालेल्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.