मध्य रेल्वे दुसऱ्या दिवशीही विस्कळीत

By admin | Published: May 27, 2016 04:29 AM2016-05-27T04:29:18+5:302016-05-27T04:29:18+5:30

मध्य रेल्वेवरील विक्रोळी येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या आॅक्झिलरी ट्रान्सफॉर्मर या यंत्रणेत बुधवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला आणि या बिघाडाचा परिणाम गुरुवारीही राहिला. बुधवारी तांत्रिक

Central Railway disrupted the next day | मध्य रेल्वे दुसऱ्या दिवशीही विस्कळीत

मध्य रेल्वे दुसऱ्या दिवशीही विस्कळीत

Next

मुंबई : मध्य रेल्वेवरील विक्रोळी येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या आॅक्झिलरी ट्रान्सफॉर्मर या यंत्रणेत बुधवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला आणि या बिघाडाचा परिणाम गुरुवारीही राहिला. बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले असतानाच त्याचा परिणाम थेट दुसऱ्या दिवसाच्या वेळापत्रकावरही झाला आणि अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली. दोन दिवसांत १00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. बुधवारी झालेल्या बिघाडामुळे जवळपास बारा तासांपेक्षा जास्त वेळ ड्युटी करणाऱ्या मोटरमननाही कामावर पोहोचण्यास उशीर झाला.
विक्रोळी स्थानकाजवळ बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास आॅक्झिलरी ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या ट्रान्सफॉर्मरमधून स्थानकाजवळील सिग्नल आणि अन्य यंत्रणांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र यंत्रणांना ठरावीक प्रमाणापेक्षा जास्त विद्युत पुरवठा झाला आणि त्यामुळे विक्रोळी स्थानकाजवळील सहाही मार्गांवरील सिग्नल यंत्रणाच ठप्प झाली. तर ओव्हरहेड वायरनाही समस्या जाणवू लागल्याने लोकलचे पेन्टाग्राफही चालणे बंद झाले. याचा मोठा फटका चार मार्गांवरील लोकल फेऱ्यांवर आणि उर्वरित दोन मार्गांवरून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर झाला. लोकलच्या गतीवरही त्याचा परिणाम झाला. (प्रतिनिधी)

कंत्राटदारावर कारवाई
विक्रोळी येथील ट्रान्सफॉर्मर दोन वर्षांपूर्वीच नवीन बसविला होता. किमान २५ वर्षे ट्रान्सफॉर्मर सुरळीत चालणे अपेक्षित असतानाच दोन वर्षांतच दोनदा बिघडल्याने ट्रान्सफॉर्मर पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

रविवारी व सुटीच्या दिवसांत मेगाब्लॉक घेऊन काय उपयोग? अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील ८ प्रवासी संघटना येत्या शनिवारी आंदोलन करणार आहेत.
- नंदकुमार देशमुख, प्रवासी संघटना

Web Title: Central Railway disrupted the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.