मध्य रेल्वेची चार महिन्यात विक्रमी कमाई; कमावले ८.५ हजार कोटी
By नितीन जगताप | Published: October 14, 2023 03:01 PM2023-10-14T15:01:22+5:302023-10-14T15:01:49+5:30
साडे आठ हजार कोटी कमावले
मुंबई : मध्य रेल्वेचा एप्रिल - सप्टेंबर २०२३ मध्ये विक्रमी एकूण महसूल ८,५६८.४१ कोटी कमावले आहेत. ये गेल्यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर- मधील रु. ७,३९५.१८ कोटी च्या तुलनेत १५.८६ टक्के जास्त आहे. मध्य रेल्वेने वाणिज्यिक महसुलात सातत्यपूर्ण आपली सर्वोत्तम कामगिरी देण्याची गती कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीत मध्य रेल्वेने रु. ८,५६८.४१ कोटीचा महसूल नोंदवला आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ७,३९५.१८ कोटीच्या तुलनेत १५.८६ टक्के अधिक आहे.
मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान मालवाहतुकीतून रु. ६०९.५० कोटीचा महसूल मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ५७१.०५ कोटीच्या तुलनेत ६.७३ टक्के अधिक आहे.मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान प्रवासी वाहतुकीतून रु. ५७४.४३ कोटीचा महसूल मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ५२७.७८ कोटीच्या तुलनेत ८.८४ टक्केअधिक आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान इतर कोचिंग महसूल रु. ६५.०६ कोटी मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ६३.७१ कोटीच्या तुलनेत २.१२ टक्के अधिक आहे (इतर कोचिंग महसूल म्हणजे पार्सल महसूल इ.)
मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान विविध महसूल रु. ३३.३१ कोटी मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ३७.०८ कोटीच्या तुलनेत -१०.१७ टक्के कमी आहे. विविध महसूल म्हणजे नॉन-फेअर रेव्हेन्यू, पार्किंग, केटरिंग, रिटायरिंग रूम इत्यादींमधून मिळणारा महसूल आहे.
मध्य रेल्वेने उत्पन्नाला चालना देण्यासाठी विभागांवर बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) ची स्थापना केली आहे. भाडे-व्यतिरिक्त महसूल उपक्रम आणि सघन विपणन आणि इतर तत्सम नाविन्यपूर्ण कल्पनांसह मुख्यालयातील विविध उपक्रमांमुळे महसुलात वाढ झाली आहे.