लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मध्य रेल्वेने मागील सहा महिन्यात ३८ दशलक्ष टनची विक्रमी मालवाहतूक केली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंतची मध्य रेल्वेची सर्वोत्तम मालवाहतूक आहे. त्यामुळे मालवाहतुकीतून मध्य रेल्वे मालामाल झाली आहे.
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३च्या पहिल्या एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत ३८ दशलक्ष टन मालवाहतूक केली. हे आतापर्यंतचे सर्वोत्तम लोडिंग आहे. निव्वळ टन किलोमीटर सप्टेंबर २०२१च्या तुलनेत सप्टेंबर २०२२ मध्ये १४.५ टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये ५.६६ दशलक्ष टन लोडिंगचे सर्वोत्कृष्ट लोडिंगही केले. मालवाहतुकीच्या महसुलाच्या बाबतीत, सप्टेंबर २०२१ मधील ५०७.४२ कोटी रुपयांवरून सप्टेंबर २०२२ मध्ये ५७१.०५ कोटी इतकी म्हणजेच १२.५४ टक्क्यांनी मालवाहतुकीत वाढ झाली.
मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये लोड केलेल्या ऑटोमोबाइल्सच्या २६ रेकच्या तुलनेत सप्टेंबर २०२२ मध्ये ऑटोमोबाइल्सचे १०२ रेक लोड केले.
अशी झाली मालवाहतूक
मध्य रेल्वेत सप्टेंबर २०२१ मध्ये कंटेनरच्या ६२४ रेक लोडिंगच्या तुलनेत सप्टेंबर २०२२ मध्ये कंटेनरचे ७१६ रेक लोड केले गेले. सप्टेंबर २०२१ मधील ८६ रेकच्या तुलनेत सप्टेंबर २०२२ मध्ये १४० लोखंड आणि स्टीलचे रेक लोड केले गेले. - पेट्रोलियम उत्पादनेचे २१६ रेक सप्टेंबर २०२२ मध्ये लोड केली गेली आहेत, त्या तुलनेत मागील वर्षीच्या याच महिन्यात १७२ रेक लोड केले होती.
मालवाहतुकीत झालेली ही वाढ मध्य रेल्वेने राबविलेल्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे झाली. तसेच व्यवसाय विकासाचे अनेक उपक्रमही सुरू केले, त्यामुळे मध्य रेल्वेला मोठा फायदा झाला. - अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"