मुंबई -मध्य रेल्वेवर रविवारी (18 नोव्हेंबर) 6 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणमधील 100 वर्षे जुना पत्री पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 170 फेऱ्या रद्द करण्यात येणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार आहे. हा दिवस प्रवाशांना मनस्ताप देणार ठरणार आहे.
रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत कल्याण स्थानकात येणारी-जाणारी सर्व वाहतूक बंद राहणार आहे. पत्री पूल वाहतुकीच्या दृष्टीने असुरक्षित असल्याची घोषणा केल्यानंतर येथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पत्री पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधून येथील प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. हा पूल पाडण्याच्या दृष्टीने वेळापत्रक आखले जात आहे. या ब्लॉकदरम्यान हजारो प्रवाशांनी पर्यायी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा, म्हणजे गैरसोय होणार नाही.