Join us

मुंबई लोकल खऱ्या अर्थाने ठरली 'जीवनवाहिनी', प्रत्यारोपणासाठी लिव्हर आणि किडनी कल्याणहुन दादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 2:25 PM

आतापर्यंत ऍम्ब्युलन्सने ब्रेन डेड व्यक्तीचे किडनी, हार्ट नेण्यात आलं. मात्र, मुंबई लोकलमधून एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यासाठी लिव्हर आणि किडनी एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.

एअर अ‍ॅम्ब्युलन्स किंवा ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून दान केलेले अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र मुंबई लोकल ट्रेनमधून, दान केलेले अवयव रूग्णालयापर्यंत पोहोचवले असल्याचं तुम्ही ऐकलंय का? मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे हे शक्य झालंय.

आतापर्यंत ऍम्ब्युलन्सने ब्रेन डेड व्यक्तीचे किडनी, हार्ट नेण्यात आलं. मात्र, मुंबई लोकलमधून एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यासाठी लिव्हर आणि किडनी एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. कल्याण ते दादर असा १ तास ७ मिनिटांचा प्रवास करून हे अवयव सुरक्षितरित्या पोहचवण्यात आले. हे शक्य झालं ते मध्य रेल्वेमुळे. मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

कल्याणच्या फोर्टीस रूग्णालयातून लिव्हर आणि किडनी हे अवयव परेलच्या फोर्टीस रूग्णालयापर्यंत पोहोचवायचे होते. हा प्रवास ६७ मिनिटांमध्ये करणं शक्य झालं आहे. मुंबईतील हे २८वं अवयवदान होतं.

मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट करण्यात आलंय. यामध्ये असं म्हटलंय की, मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने ब्रेनडेड रूग्णाचे दान केलेले लिव्हर आणि किडनी हे अवयव जलद आणि सुरक्षित माध्यम असलेल्या मुंबई लोकल ट्रेन "मुंबईची लाईफलाइन"द्वारे पोहोचवण्यात आले. कल्याणमधील फोर्टीस हॉस्पिटल ते परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलपर्यंतचा हा प्रवास होता.

टॅग्स :मुंबईआरोग्यमुंबई लोकलमध्य रेल्वे