मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
By admin | Published: July 4, 2015 11:27 PM2015-07-04T23:27:19+5:302015-07-04T23:27:19+5:30
भायखळा-विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप/डाऊन मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. ११.३० ते दु. ३.३०
डोंबिवली : भायखळा-विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप/डाऊन मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. ११.३० ते दु. ३.३० या कालावधीत आहे. परिणामी, मुख्य मार्गावरील डाऊन धीम्या गाड्या ब्लॉकच्या कालावधीत डाऊन जलदवर वळविल्या आहेत. त्यामुळे परळ, दादर, सायन, माटुंगा आणि कुर्ला स्थानकांत लोकल थांबतील. विद्याविहारनंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्या कालावधीत चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार स्थानकांत डाऊनवर त्या थांबणार नसल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. हार्बरच्या कुर्ला-वाशी अप/डाऊन दोन्ही मार्गांवर रविवारी सकाळी ११ ते दु. ३ या वेळेत ब्लॉक आहे. त्यामुळे या कालावधीत सीएसटीहून वाशीसाठी सुटणाऱ्या आणि वाशीहून सीएसटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी, यासाठी सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गांवर विशेष लोकल सोडण्यात येतील. तसेच प्रवाशांना ट्रान्स-हार्बरमार्गे ठाणे-वाशी मार्गावर आहे त्याच तिकिटावर प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. (वार्ताहर)