Join us

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By admin | Published: June 28, 2014 11:27 PM

हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड - बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे.

 विद्याविहार-भायखळासह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला, वडाळा रोड - बांद्रा मार्गावर 

ठाणो : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार-भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्यागतीसह  हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड - बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक स. 11.15 ते दु. 3.15 वा. र्पयतच्या कालावधीत असेल. त्यामुळे मुख्य मार्गावरील सर्व लोकल ब्लॉकच्या कालावधीत अप जलद गती मार्गावरुन धावतील. त्या लोकल भायखळानंतर पुन्हा धीम्या गती दिशेवरुनच अपमार्गे धावतील. 
जलद गती मार्गावरुन लोकल धावणार असल्या तरीही त्या सर्व लोकल या कुर्ला, सायन, दादर, परेल या सर्व स्थानकात थांबणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे या स्थानकात येणा-या प्रवाशांना आहे त्याच तिकिट/पासावर भायखळा स्थानकात जाऊन डाऊन मार्गे प्रवासाची मुभा देण्यात आली असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
हार्बरच्या सीएसटी-कुर्ला डाऊन दिशेवर तर वडाळा रोड-बांद्रा येथील अप-डाऊन दिशांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत बांद्रा-अंधेरीच्या सीएसटीहून सुटणा-या व तेथे येणा-या सर्व गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. हार्बरमार्गे कुल्र्याला येणा-या डाऊनच्या गाडय़ा भायखळार्पयत मुख्य मार्गावरून धावतील.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी स. 1क् ते संध्या. 6 या कालावधीत आहे त्याच तिकिट पासावर पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेचा जंबोब्लॉक
 रेल्वे रुळ, सिगAल यंत्रणा, आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी वसईरोड- भाईंदर  या स्थानकांदरम्यान अप,डाऊनच्या जलद मार्गावर पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन जंबोब्लॉक  घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री 11 ते पहाटे 3 अप जलद मार्गावर असेल. (प्रतिनिधी)