मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By admin | Published: January 23, 2016 11:23 PM2016-01-23T23:23:33+5:302016-01-23T23:23:33+5:30

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन जलदसह हार्बरच्या मशीद-चुनाभट्टी मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स. १०.३० ते दु. ३.३० आणि स. ११ ते दु. ४ या

Central Railway Megablocks | मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

Next

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन जलदसह हार्बरच्या मशीद-चुनाभट्टी मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स. १०.३० ते दु. ३.३० आणि स. ११ ते दु. ४ या वेळेत घेण्यात येणार आहेत. ठाणे-कल्याणच्या डाऊन जलद मार्गावरील ती वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे डाऊन जलदच्या डोंबिवली स्थानकात लोकल धावणार नाहीत.
हार्र्बरच्या मशीद-चुनाभट्टी मार्गासह वडाळा रोड-माहीम मार्गावर ब्लॉक असल्याने वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावरून सीएसटीसाठी आणि तेथून या स्थानकांसाठीच्या लोकल फेऱ्या ब्लॉकच्या कालावधीत रद्द करण्यात येणार आहेत. बांद्रा-अंधेरी येथून सीएसटीच्या अप/डाऊन दोन्ही दिशांवरील गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष लोकल फेऱ्या होणार असून कुर्ला स्थानकातून फलाट क्रमांक ८ वरून या गाड्या सुटतील. तसेच हार्बरच्या प्रवाशांना आहे, त्याच तिकीट/पासवर ट्रान्स-हार्बरमार्गे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून स. १० ते संध्या. ६ वाजेपर्यंत प्रवासाची मुभा असेल, असेही जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Central Railway Megablocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.