मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक

By admin | Published: November 22, 2014 10:37 PM2014-11-22T22:37:46+5:302014-11-22T22:37:46+5:30

मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गासह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड-बांद्रा स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Central Railway Megablocks Today | मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक

Next
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गासह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड-बांद्रा स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. 11.1क् ते दु. 4 या कालावधीत असेल. त्यामुळे मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणो अप जलदची वाहतूक अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून या स्थानकांदरम्यान ब्लॉकच्या कालावधीत सर्व स्थानकांवर गाडय़ा थांबतील.
हार्बरच्या सीएसटी-कुर्ला मार्गावरील डाऊन दिशेवर ब्लॉक असल्याने या कालावधीत गाडय़ा या मार्गावर भायखळ्यार्पयत धीम्या तर त्यानंतर मुख्य दिशेवरील डाऊन जलदवरून धावतील. तसेच वडाळा रोड-बांद्रा स्थानकांदरम्यान ब्लॉक असल्याने या बांद्रा-अंधेरीहून सीएसटीला येणा:या तसेच सीएसटीहून त्या मार्गावर धावणा:या गाडय़ा ब्लॉकच्या कालावधीत रद्द असतील, असे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. त्या मार्गावरील म.रे.च्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आहे त्याच तिकीट/पासावर त्यांना मुख्य तसेच पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा त्या दिवशी स. 1क् ते संध्या. 6 या कालावधीत देण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 
डोंबिवली : चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान  अप/डाऊन जलद मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. 1क्.35 ते दु. 3.35 या वेळेत असेल. त्यामुळे या कालावधीत वरील स्थानकांदरम्यान लोकल अप/डाऊन धीम्या दिशांवर वळविण्यात आल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Central Railway Megablocks Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.