मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक
By admin | Published: February 28, 2015 11:06 PM2015-02-28T23:06:21+5:302015-02-28T23:06:21+5:30
कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावरील अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
डोंबिवली : कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावरील अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स. ११.१० ते दु. ४.१० आणि स. ११ ते दु. ३ या कालावधीत असतील.
त्यामुळे अप जलदची वाहतूक कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून त्या लोकल सर्व स्थानकांत थांबतील. ठाण्यानंतर त्या पुन्हा जलद मार्गावरून धावतील.
हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावर दोन्ही दिशांवर ब्लॉक असल्याने या कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसटीकडे व सीएसटीहून तेथे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी मार्गांवर विशेष लोकल धावतील़
दादर-रत्नागिरी दिव्यातून सुटणार
४दादर-दिवा लोकल : कल्याण-ठाणे अप जलदच्या ब्लॉकमुळे दादर-रत्नागिरी ही कोकणात जाणारी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातूनच सुटणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी दादर स्थानकातून दिव्यासाठी दु. ३.३५ ला लोकल सुटणार असून ती ठाण्याला दु. ४.०३ ला तर दिव्यात दु. ४.१३ ला पोहोचेल, असे जनसंपर्क विभागाने नमूद केले आहे.