मध्य रेल्वेचे प्रवासी २.८ कोटींनी वाढले, एप्रिल ते डिसेंबरपर्यंत १२० कोटी लोकांनी केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:25 IST2025-01-23T11:25:12+5:302025-01-23T11:25:16+5:30
Central Railway: मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असून, एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान १२०.२ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये १४.४ कोटी प्रवाशांनी मेल-एक्स्प्रेसमधून, तर १०५.८ कोटी प्रवाशांनी लोकलमधून प्रवास केला.

मध्य रेल्वेचे प्रवासी २.८ कोटींनी वाढले, एप्रिल ते डिसेंबरपर्यंत १२० कोटी लोकांनी केला प्रवास
मुंबई - मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असून, एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान १२०.२ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये १४.४ कोटी प्रवाशांनी मेल-एक्स्प्रेसमधून, तर १०५.८ कोटी प्रवाशांनी लोकलमधून प्रवास केला. गेल्यावर्षीच्या याच कालावधीत ११७.४ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत एकूण २.८ कोटी (२.४० टक्के) प्रवासी संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेला एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान प्रवासी वाहतुकीतून पाच हजार ५७१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर, २०२३ मध्ये याच कालावधीत पाच हजार ४०१ कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच ही वाढ १७० कोटी रुपयांची आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत उपनगरी सेवेतून ७२२ कोटी रुपये मिळाले. गेल्यावर्षी हे उत्पन्न ६८४ कोटी रुपये होते. यामध्ये ५.५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आणि डिसेंबर २०२४ पर्यंत मेल-एक्स्प्रेसच्या माध्यमातून ४,८४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी याच कालावधीत ४,७१७ कोटी रुपये मिळाले होते.
प्रवासी (संख्या कोटींमध्ये)
वर्ष एकूण प्रवासी उपनगरी मेल/ एक्स्प्रेस
२०२३ ११७.४ १०३.६ १३.८
२०२४ १२०.२ १०५.८ १४.४
महसूल (रक्कम कोटींमध्ये)
वर्ष महसूल उपनगरी एक्स्प्रेस
२०२३ ५,४०१ ६४८ ४,४१७
२०२४ ५,५७१ ७७२ ४,८४९