- महेश चेमटे मुंबई : लोकलमधील गर्दीने त्रस्त असलेल्या सुमारे ४० लाख प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजूरी मिळालेल्या तब्बल आठ लोकल मध्य रेल्वेवर दाखल होणार आहे. नवीन लोकल दाखल झाल्यानंतर मध्य मार्गासह हार्बर मार्गावरील प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे.मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या १६५ रेक (१२ बोगींची एक लोकल-रेक) आहेत. यात हवा खेळती राहण्यासाठी विशेष व्यवस्था असलेल्या २१ बंबार्डिअर रेकचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘रेल्वे बोर्डातील रोलिंग स्टॉक प्रोग्राम (आरएसपी फंड) निधीअंतर्गत ५ बंबार्डिअर रेक मध्य रेल्वेत या वर्षाअखेर दाखल होणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रलकोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ)या लोकलची बांधणी होतआहे. उर्वरित ३ बंबार्डिअर लोकल पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे.’ताशी १२० किलोमीटर प्रतितास धावण्याची क्षमतेसह अत्याधुनिक बनावटीची बंबार्डिअर लोकल सीएसएमटी ते कर्जत-कसारा मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. नवीन लोकल आल्यानंतर या मार्गावरील लोकल हार्बर मार्गावर नेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.बेलापूर-सीवूड-उरण प्रकल्पातील खारकोपरपर्यंचा पहिला टप्प पूर्ण झाला आहे. मात्र लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयोगाच्या मंजूरीची आवश्यकता आहे. ३० दिवसांच्या आत मंजूरी मिळाल्यानंतर सिमेन्स बनावटीच्या लोकल या टप्प्यात मार्गस्थ करण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.सध्या हार्बर मार्गावरजून्या लोकल धावत असल्याने प्रवाशांना प्रवास असह्य होत आहे. टप्प्याटप्याने बंबार्डिअर आणि सिमेन्स बनावटीच्या लोकलची संख्या वाढवून जून्या लोकल हद्दपार करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मुंबई शहरी परिवहन प्रकल्प २ (एमयूटीपी-२) मधील ७२ बंबार्डिअर लोकलसह एकूण ८४ बंबार्डिअर लोकल मुंबई शहरात धावत आहे. नवीन बंबार्डिर लोकल आल्यानंतर मध्य रेल्वेसह हार्बर आणि ट्रान्सहार्बर प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.>दिवाळीच्या आसपास प्रवाशांना सुखद बातमी मिळणार आहे. या बातमीमुळे प्रवाशांना सुखकर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.- डि.के.शर्मा, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे.
मध्य रेल्वे प्रवाशांना अच्छे दिन, ८ नवीन बंबार्डिअर लोकल येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 3:34 AM