मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पाचपटींनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:08 AM2021-03-04T04:08:44+5:302021-03-04T04:08:44+5:30

५० रुपये मोजावे लागणार; काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

Central Railway platform tickets increased fivefold | मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पाचपटींनी वाढले

मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पाचपटींनी वाढले

Next

५० रुपये मोजावे लागणार; काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने तसेच आगामी उन्हाळ्यात जास्त गर्दी होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने मुंबई महानगर प्रदेशातील काही महत्त्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत पाचपटींनी वाढ केल्याचे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. त्यानुसार आता प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी ५० रुपये माेजावे लागतील.

एप्रिल ते मे महिन्यांत मुंबई आणि परिसरातील रेल्वेस्थानकांवर शहराबाहेर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोनाचा काळ लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी तिकिटाची किंमत वाढविण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता १० ऐवजी ५० रुपये आकारले जात आहेत. नवा दर २४ फेब्रुवारीला लागू झाला असून या वर्षी १५ जूनपर्यंत तो कायम राहील.

Web Title: Central Railway platform tickets increased fivefold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.