Join us

मध्य रेल्वे प्रसन्न... गणपतीसाठी 202 विशेष गाड्या; गावाक चला... उद्यापासून रिझर्व्हेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 6:00 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनंदिन विशेषच्या ३६ फेऱ्या होणार आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये म्हणून मध्य रेल्वेने २०२ गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर विशेष शुल्कासह २१ जुलैपासून सुरू होईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - करमाळी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत या गाड्यांचे बुकिंग, पावसाळ्यात वेळापत्रकात बदल झाल्यामुळे बंद करण्यात आले होते. २१ जुलैपासून हे पुन्हा सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनंदिन विशेषच्या ३६ फेऱ्या होणार आहेत.

०११५१ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ ते १८ सप्टेंबर दरम्यान (१८ फेऱ्या) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. हीच गाडी दररोज १५:१० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनंदिन विशेषच्या ३६ फेऱ्या होतील. ०११५३ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ ते १८ सप्टेंबर (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

प्रवाशांनो, असे असेल विशेष गाड्यांचे वेळापत्रक

 लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस दैनंदिन विशेषच्या ३६ फेऱ्या होतील. ०११६७ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ ते १८ सप्टेंबरदरम्यान (१८ फेऱ्या) दररोज २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

 लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस दैनंदिन विशेषच्या ३६ फेऱ्या होतील. ०११७१ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ ते १८ सप्टेंबरदरम्यान (१८ फेऱ्या) दररोज ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

 लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस त्रि - साप्ताहिक विशेषच्या १६ फेऱ्या होतील. ०११८५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी २ ते १८ सप्टेंबर (८ फेऱ्या) दरम्यान ००.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

 लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित साप्ताहिक विशेषच्या ६ फेऱ्या होतील. ०११६५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी ३, १० आणि १७ रोजी (३ फेऱ्या) ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

 दिवा - चिपळूण - दिवा मेमू दैनंदिन अनारक्षित विशेषच्या ३६ फेऱ्या होतील. ०११५५ मेमू विशेष दिवा येथून १ ते १८ सप्टेंबरदरम्यान (१८ फेऱ्या) ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

टॅग्स :रेल्वे