Join us

मध्य रेल्वेने आयसोलेशन कक्षासाठी तयार केल्या ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 7:00 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी डब्यांचे आयसोलेशन कक्षात रुपांतर करत आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी डब्यांचे आयसोलेशन कक्षात रुपांतर करत आहे. या आयसोलेशन कक्षासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने स्वतः ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली तयार केल्या आहेत. या ट्रॉल्या रेल्वेच्या रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. 

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी रुग्णालयातील सामग्रीचा तुटवडा होऊ नये, यासाठी ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली तयार केल्या आहेत.  मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपने अत्यंत कमी वेळात ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉलींची निर्मिती केली आहे. भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालय येथे या ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येक स्तरातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशी डब्यांचे आयसोलेशन कक्षात रुपांतर करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार देशभरात एकुण ५ हजार जुन्या आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्यात येणार आहे. यापैकी ५०-६० टक्के डब्यांचे आयसोलेशन कक्षांत रूपांतर झाले आहे. तर, मध्य रेल्वेने कोचिंग केअर सेंटर आणि वर्कशॉपमध्ये ७० हून अधिक आयसोलेशन कक्ष तयार केले आहे. या आयसोलेशन कक्षात ऑक्सिजन ट्रॉलीचा उपयोग होणार आहेत. 

-------------------------------------------------------

भारतीय रेल्वेला गंभीर परिस्थितीची जाण आहे. कोरोना विरूद्ध संघर्ष करण्यासाठी मध्य रेल्वेचे कर्मचारी २४×७ परिश्रम करत आहेत. परळ वर्कशॉपचे कार्य उल्लेखनीय आणि वाखण्यासारखे आहे. यामुळे रेल्वे रुग्णालयांना दैनंदिन कामात मदत होणार आहे. परळ वर्कशॉपमध्ये आतापर्यंत  ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली तयार केल्या आहेत.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस