मुंबई : मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात सोमवारी मध्य रेल्वेच्या लोकल सेवांच्या विलंबाने झाली. मेगाब्लॉकनंतरही लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. २९ आॅगस्ट रोजी मुंबईत पुरामुळे तब्बल २९ लोकलच्या यंत्रणेत पाणी गेले होते. त्यांपैकी बहुतांश लोकल दुरुस्त करण्यास उशीर होत असल्यामुळेच लोकलला लेटमार्क लागल्याची माहिती समोर येत आहे.उपनगरीय रेल्वे मार्गावर रोज सुमारे १५६ लोकलच्या १ हजार ६०० पेक्षा जास्त फेºया होतात. ‘पिक अव्हर’ मध्ये लोकल फे-यांची संख्या जास्त असते. २९ आॅगस्टला शहरात तुंबलेल्या पाण्याचा फटका मुंबईकरांसह रेल्वे सेवांनाही बसला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसामुळे खराब झालेल्या २९ लोकलपैकी २८ लोकल दुरूस्तीनंतर सेवेत दाखल झाल्या आहेत. उर्वरित एक लोकल कुर्ला येथे उभी असून लवकरच ती देखील सेवेत दाखल होईल, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंह यांनी दिली.बुलेट नको ‘लोकल’ वेळेत द्या !मुंबईमधून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. असे असूनही लोकल वेळेत पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यात रेल्वे प्रशासनाकडून सध्या प्रवाशांना बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवण्यात येत आहे. परिणामी, ‘बुलेट ट्रेन नको, किमान लोकल वेळेत सोडा’ अशी विनंती घाटकोपर येथे राहणाºया शेखर जगताप या प्रवाशाने केली.
मध्य रेल्वेच्या लोकलला ‘लेटमार्क’चे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 4:28 AM