मुंबई :मध्य रेल्वेने जानेवारी महिन्यात प्रवासी उत्पन्नातून १६३७.६९ कोटी रुपयांची कमाई केली असून, १४४.९३ दशलक्ष प्रवाशांनी मध्य रेल्वेतून प्रवास केला आहे. तर वस्तूंपासून ८५६.४१ कोटी आणि कोचिंग महसूल आणि विविध कमाईतून मध्य रेल्वेला ११०.६३ कोटी मिळाले आहेत.
मध्य रेल्वेला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४८६७.२० कोटी विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १३.४१ टक्के अधिक कमाई झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी हा महसूल १३१०९.७९ कोटी होता. २०२३-२४ मध्ये ६०७१.०४ कोटी प्रवासी महसुलातून मिळाले आहेत. मागील वर्षी हा आकडा ५२९१.७३ कोटी होता. वस्तूंमधून ७६७४.९५ कोटी मिळाले तर मागील वर्षी हा आकडा ६७९९.६७ कोटी होता. इतर कोचिंग आणि विविध महसुलातून ११२१.२१ कोटी मिळाले. मागील वर्षीच्या १०१८.३९ कोटी प्राप्त झाले होते. २०२३-२४ मध्ये प्रवाशांची संख्या १३१८.५८ दशलक्ष झाली तर २०२२-२३ मधील १२०८.७८ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत ९.०८ टक्क्यांची वाढ झाली आहे.