Join us

मध्य रेल्वेचा ठाणे-कल्याण प्रवाशांना दिलासा; एक्स्प्रेसला मिळणार थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:51 AM

मध्य रेल्वेने ठाणे-कल्याण येथील प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. ५ एक्स्प्रेसला कल्याण-ठाणे स्थानकांत विशेष थांबा होता. नुकतीच ही मुदत संपली आहे. मात्र आता प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने ३० जूनपर्यंत या एक्स्प्रेसला थांबा देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. प्रत्येकी २ मिनिटांचा थांबा पाच मेल-एक्स्प्रेसला मिळेल.

मुंबई: मध्य रेल्वेने ठाणे-कल्याण येथील प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. ५ एक्स्प्रेसला कल्याण-ठाणे स्थानकांत विशेष थांबा होता. नुकतीच ही मुदत संपली आहे. मात्र आता प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने ३० जूनपर्यंत या एक्स्प्रेसला थांबा देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. प्रत्येकी २ मिनिटांचा थांबा पाच मेल-एक्स्प्रेसला मिळेल.मध्य रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. यात ठाणे-कल्याण स्थानकांतील प्रवाशांसाठी पाच एक्स्प्रेस थांब्याचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली. नुकतीच एक्स्प्रेस थांब्याची मुदत संपल्याने तिला सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. कल्याण-ठाणे स्थानकांत ३ अप आणि २ डाऊन एक्स्प्रेस थांब्याचा विस्तार होईल. यात १२१३८ फिरोझपूर-सीएसएमटी पंजाब मेल, ११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, १२११० मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, २२१०१ सीएसएमटी-राज्यराणी एक्स्प्रेस आणि १८५२० सीएसएमटी-विशाखापट्टणम् एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कल्याण-ठाणेमधील लाखो प्रवाशांची पायपीट थांबेल. शिवाय दादर स्थानकातील अतिरिक्त प्रवासी गर्दी टाळण्यातही रेल्वे प्रशासनाला यश येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

टॅग्स :मध्य रेल्वे