Join us

६० दिवसात मध्य रेल्वेची १.४२ लाख वॅगनद्वारे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 6:46 PM

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मध्य रेल्वेने अन्नधान्य, साखर, खते, कोळसा, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर अशा आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी २४ तास सेवा दिली आहे.

 

मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मध्य रेल्वेने अन्नधान्य, साखर, खते, कोळसा, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर अशा आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी २४ तास सेवा दिली आहे. यामध्ये मध्य रेल्वेने मागील ६०  दिवसात तीन हजार मालगाड्या चालवल्या आहे. यातून  मध्य रेल्वेची १.४२ लाख  वॅगनची मालवाहतूक करण्यात आली आहे.  या लॉकडाऊन दरम्यान दररोज सरासरी २ हजार ३६७ वॅगन लोड करण्यात आल्या.

मध्य रेल्वेने देशातील वीजपुरवठा खंडित न करण्यासाठी ५९ हजार ४८७ वॅगन कोळसा वीज प्रकल्पासाठी वाहून नेण्यात आले आहे.  वेळेवर वितरणासाठी धान्य व साखर यांचे १ हजार ८१९   वॅगन, खते ५ हजार ८६१   वॅगन आणि कांद्याची ५८७ वॅगन,  सर्व भागधारकांना इंधन सुरळीत पुरवठा करण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांची टँक वॅगन १४  हजार ४२  , उद्योगांकरिता २ हजार ३४९ वॅगन लोखंड व स्टील, ५१ हजार २१५  कंटेनर वॅगन आणि इतर विविध उत्पादनांच्या सुमारे ६ हजार ६९६ वॅगन यांची वाहतूक करण्यात आली आहे. या सर्व जीवनावश्यक सामग्री ७.६ दशलक्ष असून याची वाहतूक देशभर केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.----------------------------

पश्चिम रेल्वेची २७४ पार्सल गाड्याद्वारे ४१ हजार टन सामग्रीची वाहतुक 

लॉकडाउनमध्ये पश्चिम रेल्वेने २७४ पार्सल गाडया चालविण्याचे नियोजन केले. यासाठी खास वेळापत्रकाची निर्मिती केली असून यातून ४१ हजार टन सामग्रीची वाहतूक केली आहे. यामधून पश्चिम रेल्वेला १२ कोटी ४३ लाख रुपयांचा महसुल मिळालेला आहे.

जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सामग्री, शेतीतील माल वेळेत ग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी मालगाडी, पार्सल सेवा सुरू आहे.  फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि बी-बियाणे यासह नाशवंत वस्तूंसाठी रेल्वेने पार्सल विशेष ट्रेनचे मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार अन्नधान्य,पदार्थ पोहोचविण्यात येत आहेत.  पश्चिम रेल्वेने २२ मार्च ते २७ मे दरम्यान ४ हजार ६४८ मालगाड्यांच्या आधारे ९.६० दशलक्ष टन मालाची ने-आण केली आहे. 

माल वाहतुकीमधुन पश्चिम रेल्वेला १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.यामध्ये सर्वाधिक ३३ दुधाच्या ट्रेन चालविण्यात आल्या. त्यातून पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत सुमारे ४ कोटी १७ लाख रुपयांची भर पडली आहे. कोरोना विशेष पार्सल वाहतुकीमधून ७ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न मिळाले.

--------------------------------एक हजार कोटीचे नुकसानकोरोनामुळे उपनगरीय रेल्वेची वाहतुक २३ मार्चपासुन बंद आहे.उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे मार्गावर संपुर्ण पश्चिम रेल्ेव मार्गावर एकुण १ हजार ४६.३७ कोटीचे नुकसान झाले आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेने  ४३ लाख ६० हजार  प्रवाशांंना तिकिटांचा परतावा म्हणून २८४ कोटी ४७  लाख रुपये देण्यात आले आहेत यापैकी मुंबई विभागात १३५  कोटी ९८ लाख रुपये परतावा दिला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. 

  --------------------------------  

 

टॅग्स :अन्नरेल्वेकोरोना वायरस बातम्या