Join us

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माटुंगा-सायन स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 11:58 AM

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. माटुंगा-सायन स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे  मध्य रेल्वेवरील वाहतूक तब्बल अर्धा तास उशिरा सुरू आहे. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला होता. यामुळे जवळपास 30 मिनिटं डाऊन तसंच अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.  शिवाय, ज्यावेळी हा बिघाड झाला त्यावेळी एक लोकल जवळपास 30 मिनिटे सायन स्टेशनपासून काही अंतरावर पुढे खोळंबली होती.

या तांत्रिक बिघाडामुळे दुपारच्या वेळेतील बहुतांश लोकल फे-या मंद गतीनं सुरू आहेत. दरम्यान, युद्धपातळीवर बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  मध्य रेल्वेच्या दररोजच्या खोळंब्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :मध्य रेल्वेभारतीय रेल्वे