Join us

मध्य रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, अधिक आरामदायक होणार; प्रवासी सुरक्षा आणि सोयीसाठी नावीन्यपूर्ण कल्पना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 5:18 AM

Central Railway : गेल्या एक वर्षात सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनव कल्पनांपैकी, स्वयंचलित तिकीटतपासणी व व्यवस्थापकीय प्रवेश प्रणाली (एटीएमए सिस्टीम), एझिस्पीट स्पिटून, वेंडिंग कियॉक्स आणि बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा आहेत.

मुंबई : मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक प्रवास करता यावा म्हणून विविध उपक्रम राबवत आहे. यासाठी महसूलवाढीसाठी आणि प्रवाशांची सुविधा सुधारण्यासाठी नवीन कल्पना आणि संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेच्या ‘नवीन, इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम’ (एनआयएनएफआरआयएस) चा फायदा घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या हितासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी नावीन्यपूर्ण कल्पना आणल्या आहेत. गेल्या एक वर्षात सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनव कल्पनांपैकी, स्वयंचलित तिकीटतपासणी व व्यवस्थापकीय प्रवेश प्रणाली (एटीएमए सिस्टीम), एझिस्पीट स्पिटून, वेंडिंग कियॉक्स आणि बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा आहेत.  कोरोना आजारपणाची साथ सर्व देशभर पसरल्याच्या पार्श्वभूमीवर यापैकी कित्येक अभिनव कल्पना सुरक्षा उपाय म्हणून लागू केले आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

या आहेत सुविधाबॅगेज रॅपिंग आणि सॅनिटेशन सुविधा : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नागपूर आणि पुणे स्टेशन येथे अतिनील किरणांद्वारे पॅसेंजरचे सामान, सामान आणि पार्सलसाठी बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा सुरू केली आहे. स्वयंचलित वेंडिंग कियॉस्क : मुंबई, नागपूर आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर स्थापित स्वयंचलित वेंडिंग कियॉस्कने मुखपट्टी, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझरच्या बाटल्या इत्यादी संरक्षणात्मक साधनांची उपलब्धता देऊन प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेडरोल वेंडिंग कियॉस्कद्वारे प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल दिला जातो.टीएमए सिस्टीम : नागपूर स्थानकात उभारलेल्या स्वयंचलित तिकीट आणि व्यवस्थापकीय प्रवेश प्रणालीमुळे प्रवाशांना तिकीट सद्य:स्थिती शोधता येते. तसेच बोर्डिंग प्रोटोकॉलच्या स्वयंचलित अंमलबजावणीद्वारे ही यंत्रणा कार्यरत केली जाते.  एझिस्पिट स्पिटून : नागपूर रेल्वेस्थानकात सार्वजनिक थुंकण्यापासून होणारी अडचण टाळण्यासाठी इझिस्पिट स्पिटून अभिनव कंटेनर वेंडिंग मशीन हा एक अभिनव उपाय केला आहे. स्पिट कंटेनर, स्पिट पाउच आणि व्होमिट किट या उत्पादनांच्या विक्रीसाठी नागपूर रेल्वेस्थानकात दोन स्वयंचलित वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या. या माध्यमातून रेल्वे परिसर आरोग्यदायी आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.

टॅग्स :मध्य रेल्वेरेल्वे