निवृत्त टीसींना पुन्हा कामावर घ्या; रेल्वे महाव्यवस्थापकांचे रेल्वे बोर्डाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:44 AM2023-11-21T09:44:31+5:302023-11-21T09:45:27+5:30
रेल्वे महाव्यवस्थापकांचे रेल्वे बोर्डाला पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेने तिकीट तपासणीतून गेल्या वर्षी ३०३ कोटींचा मिळविला होता. भारतीय रेल्वेवरील तो विक्रम होता. सध्या मध्य रेल्वेवर ३,९३५ टीसींची आवश्यकता आहे. परंतु सध्या ३,२६५ टीसी कार्यरत आहेत. इतर पदांसह एकूण ६८८ पदे रिक्त आहेत. टीसीची कमतरता दूर करण्यासाठी सेवानिवृत्त टीसीना सेवेत घेण्याची योजना पुन्हा सुरू करावी, अशी विनंती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रेल्वे बोर्डाला केली आहे.
रिक्त पदांमुळे तिकीट निरीक्षण तीव्र करणे, प्रवासी सेवा वाढवणे, वाढीव तिकीट विक्रीद्वारे महसूल वाढविणे यास अडचणी येतात त्यामुळे रिक्त पदे हे सेवानिवृत्त टीसींना सेवेत घेऊन करावी, अशी मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी रेल्वे बोर्डाला केली आहे.
मध्य रेल्वेच्या टीसीवर कर्मचाऱ्यांवर ताण कमी करण्यासाठी निवृत्त टीसींची भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे. ती काहीकाळापर्यंत ठीक आहे. परंतु भरतीद्वारे टीसी घेण्यास प्राधान्य द्यायला हवे.
- प्रवीण वाजपेयी,
महामंत्री, सीआरएमएस
महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यास मदत
गाड्यांचे व्यवस्थापन चांगल्यारीतीने करता येईल आणि चांगली प्रवासी सेवा प्रदान केली जाईल आणि तक्रारी कमी करणे शक्य होईल. महाराष्ट्र पोलिस महासंचालकांनी प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये तिकीट तपासणी तीव्र करण्यावरही भर दिला आहे. कारण अटक केलेल्या गुन्हेगारांपैकी ८० ते ९० टक्के गुन्हेगार हे विनातिकीट होते. आहे. यामुळे प्रवाशांसाठी विशेषतः महिलांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.