मध्य रेल्वेचा लांब पल्ला होणार प्रवाशांसाठी सुकर
By admin | Published: February 18, 2015 02:21 AM2015-02-18T02:21:08+5:302015-02-18T02:21:08+5:30
लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवास सुकर करण्यासाठी ११ गाड्यांना कायमस्वरूपी ज्यादा डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवास सुकर करण्यासाठी ११ गाड्यांना कायमस्वरूपी ज्यादा डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामध्ये एसी थ्री टायर, स्लीपर कोच आणि दोन सेकंड क्लास चेयर कारचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
दादर-करमाळी जनशताब्दी एक्स्प्रेसला आणि दादर-औरंगाबाद जनशताब्दी एक्स्प्रेसला प्रत्येकी दोन सेकंड क्लास चेयर कार डबा १९ फेब्रुवारीपासून, एलटीटी-कोच्चुवेली एक्स्प्रेसला एक स्लीपर क्लास डबा २१ फेब्रुवारीपासून, एलटीटी-पुरी एक्स्प्रेसला एक स्लीपर क्लास डबा २२ फेब्रुवारीपासून, एलटीटी-अमृतसर एक्स्प्रेसला एक स्लीपर क्लास डबा चाळीसगाव आणि अमृतसरपासून २० फेब्रुवारीपासून, एलटीटी-वाराणसी कामयानी एक्स्प्रेसला एक स्लीपर क्लास डबा २१ फेब्रुवारीपासून, एलटीटी-मदुराई एक्स्प्रेसला एक स्लीपर क्लास डबा २० फेब्रुवारीपासून, नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस एक स्लीपर क्लास डबा २१ फेब्रुवारीपासून, नागपूर-जयपूर एक्स्प्रेसला एक स्लीपर क्लास डबा १९ फेब्रुवारीपासून, नागपूर-पुणे एक्स्प्रेसला एक एसी थ्री टायर डबा २१ फेब्रुवारीपासून, पुणे-निजामुद्दीन - पंढरपूर - बारामती पॅसेंजरला एक स्लीपर क्लास डबा १९ फेब्रुवारीपासून जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.