Join us

दिवाळी/छटपुजासाठी मध्य रेल्वे २४ वातानुकूलित विशेष ट्रेन चालवणार

By नितीन जगताप | Updated: October 14, 2023 14:57 IST

छपरा- लोकमान्य टिळक टर्मिनस - सिवान वातानुकूलित साप्ताहिक अतिजलद विशेष (१२ सेवा) २२ एलएचबी कोचची असेल.

नितीन जगताप

मुंबई :  प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे २४ दिवाळी/छठपूजासाठी वातानुकूलित विशेष गाड्या चालवणार आहे .तिकीट आरक्षण १६ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 

छपरा- लोकमान्य टिळक टर्मिनस - सिवान वातानुकूलित साप्ताहिक अतिजलद विशेष (१२ सेवा) २२ एलएचबी कोचची असेल. ही गाडी २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर (६ सेवा) दर शुक्रवारी १६.१५ वाजता छप्रा येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल.  तर एसी स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २२ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर पर्यंत दर रविवारी १२.४५ वाजता सुटेल आणि सिवान येथे दुसऱ्या दिवशी ०३.१५ वाजता पोहोचेल. गोरखपूर - महबूबनगर वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१३ सेवा) २२ एलएचबी कोचची असेल.एसी स्पेशल गोरखपूर येथून २१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर (६ सेवा) दर शनिवारी सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि महबूबनगर येथे दुसऱ्या दिवशी १९.३० वाजता  पोहोचेल.  तर एसी स्पेशल २३ ऑक्टोबर  ते २७ नोव्हेंबर (६ सेवा) पर्यंत दर सोमवारी महबूबनगर येथून १८.०० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.०० वाजता पोहोचेल.

 

टॅग्स :रेल्वेमुंबईदिवाळी 2022