Join us

विठूरायाच्या दर्शनासाठी जायचंय चिंता नकाे; मध्य रेल्वेकडून ६४ विशेष ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 9:34 AM

भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : आषाढी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेपंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. नागपूर-मिरज विशेष (२ सेवा), नागपूर-मिरज विशेष (२ सेवा), नवी अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा), खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा), लातूर-पंढरपूर (१० सेवा), भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा), मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा), मिरज-कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) या सेवांचा यात समावेश आहे.

नागपूर-मिरज विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०५ विशेष १४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०६ विशेष १८ रोजी मिरज येथून  १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. नागपूर - मिरज विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०७  विशेष गाडी १५ रोजी नागपूर येथून ८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरज येथे  पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०८ विशेष गाडी १९ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

नवी अमरावती-  पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी क्रमांक ०१११९ विशेष नवी अमरावती येथून १३ आणि १६ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता  पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२० विशेष पंढरपूर येथून १४ आणि १७ रोजी १९.३० वाजता सुटेल आणि नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.

खामगाव-  पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी क्रमांक ०११२१ विशेष खामगाव १४ आणि १७ रोजी ११.३० वाजता सुटेल  आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२२ विशेष पंढरपूर येथून १५ आणि १८ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल.

 लातूर-  पंढरपूर (१० सेवा) गाडी क्रमांक ०११०१ स्पेशल लातूर येथून १२, १५, १६, १७, आणि १९ रोजी ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०२ विशेष पंढरपूर येथून १२, १५, १६, १७, आणि १९ रोजी १३.५० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी  १९.२० वाजता पोहोचेल.

 भुसावळ -  पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष भुसावळ येथून १६ रोजी १३.३० वा. सुटेल आणि पंढरपूर येथे  दुसऱ्या दिवशी ३.३० वा. पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष पंढरपूर येथून १७ रोजी २२.३० वा. सुटेल, भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वा.  पोहोचेल.

 मिरज -  पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) गाडी क्रमांक ०११०७ मेमू विशेष मिरज येथून १२ ते २१ जुलै दरम्यान ०५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता  पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०८ मेमू विशेष पंढरपूर येथून १२ ते २१ दरम्यान ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १३.५० वाजता  पोहोचेल.

 मिरज -  कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) गाडी क्रमांक ०१२०९ मेमू विशेष मिरज येथून १२ ते २१ दरम्यान १५.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१० मेमू विशेष कुर्डुवाडी येथून १२ ते २१ दरम्यान २१.२५ वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ०१.०० वाजता पोहोचेल.

 

टॅग्स :मुंबईपंढरपूरमध्य रेल्वेआषाढी एकादशी