Join us

मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा चालवणार

By सचिन लुंगसे | Published: April 17, 2024 6:36 PM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बनारस साप्ताहिक विशेष १० फेऱ्या असणार आहेत.

मुंबई : उन्हाळ्याच्या सुटटयांत गावी जाण्यासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष रेल्वे गाड्याचा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दक्षिण आणि उत्तर भारतासाठी रेल्वे गाड्या चालविल्या जाणार असून, त्याचा फायदा उत्तर महाराष्ट्रात जाणा-या चाकरमान्यांना होणार आहे. या गाडयांच्या थांब्यांत दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळचा समावेश आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बनारस साप्ताहिक विशेष १० फेऱ्या असणार आहेत. ०११३७ साप्ताहिक विशेष गाडी २१ एप्रिल ते १९ मेपर्यंत दर रविवारी १४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोरखपुर साप्ताहिक विशेष १२  फेऱ्या असणार आहेत. ०११६९ साप्ताहिक विशेष गाडी  १९ एप्रिल ते २४ मे पर्यंत दर शुक्रवारी ००.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस - समस्तीपुर अनारक्षित साप्ताहिक विशेष १४ फेर्‍या असतील. ०१०३९ अनारक्षित साप्ताहिक विशेष २२ एप्रिल ते ३ जून पर्यंत दर सोमवारी १५.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस - दानापुर साप्ताहिक विशेष १४  फेऱ्या होतील. ०११५५ साप्ताहिक विशेष गाडी १५ एप्रिल ते २७ मे पर्यंत दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बनारस साप्ताहिक विशेष १०  फेऱ्या होतील. ०११४१ साप्ताहिक विशेष प्रत्येक सोमवारी १५ एप्रिल ते १३ मे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १४.३० वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोरखपुर साप्ताहिक विशेष १०  फेऱ्या होतील. ०११४३ साप्ताहिक विशेष गाडी १८ एप्रिल ते १६ जून पर्यंत दर गुरुवारी १४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.

टॅग्स :रेल्वे